सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! रक्षाबंधनापूर्वी येणार मोठी भेट! वाचा सविस्तर माहिती


7th Pay Commission News : सरकारी नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. काही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून यंदा सरकारी कर्मचाऱ्यांची रक्षाबंधन मोठ्या थाटामाटात होणार असल्याचे म्हटले जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार मोठी भेट देणार आहे. केंद्र सरकार महागाई भत्ता वाढवण्याच्या तयारीत असून, जुलै 2025 पासून थेट 3% वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढीव रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारात ऑगस्टच्या पगारांसोबत (September मध्ये मिळणाऱ्या) जोडली जाणार आहे. 7th Pay Commission News

सध्या किती आणि किती होणार ?

सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 55% महागाई भत्ता मिळतोय, जो जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आला होता. मात्र आता AIICP निर्देशानुसार, ही रक्कम 58% पर्यंत नेली जाणार आहे. म्हणजेच, कर्मचाऱ्यांच्या हाती थेट अधिक रक्कम येणार, ज्यामुळे रक्षाबंधनापूर्वी त्यांच्या घरात खरेदीचा आणि आनंदाचा वातावरण तयार होणार आहे.

जानेवारी ते जून 2025 पर्यंत महागाई निर्देशकांच्या आधारे DA (महागाई भत्ता) निश्चित केला जातो. यंदाही निर्देशांक असे होते

जानेवारी – 143.2, फेब्रुवारी – 142.8, मार्च – 143.0, एप्रिल – 143.5, मे – 144.0,जून – 145.0, या आकड्यावरून एकच अंदाज बांधला जातो की यंदा DA मध्ये तीन टक्क्यांची वाढ होईल.

महागाई भत्ता वाढीचा निर्णय दसरा किंवा दिवाळीच्या आसपास होतो. परंतु यंदा AICPI आकडे आधीच जाहीर झालेले, त्यामुळे रक्षाबंधनाच्या आधी हा निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर सरकारने वेळेत घोषणा केली, तर कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचा वाढीव भत्ता आणि फरकाची रक्कम आवश्यक पगारात मिळू शकते.

DA 3% ने वाढल्यास, एका सरासरी मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा 2 हजार ते 4000 रुपयांचे वाढ होऊ शकते. हा फरक छोटा वाटला तरी, महिन्याला हाती पडणारी ही रक्कम घर खर्च, शाळेची फी, हप्ते, किराणा यासाठी मदत करू शकणार आहे. अशात पुढील अपडेट साठी आम्हाला फॉलो करत चला जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल.

हे पण वाचा | 8 Pay Commission News : सेवानिवृत्तांनो, आता आठवा वेतन आयोग, महागाई भत्ता विसराच! सरकारचा नवा कायदा लागू

Leave a Comment

error: Content is protected !!