Crop Insurance Updates: राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून वाचवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून काढलेल्या पिकाचा पिक विमा दिला जातो. प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेच्या शेवटच्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. दरम्यान याबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. पिक विमा योजनेच्या शेवटच्या हप्त्यासाठी 7600 कोटी रुपये विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना लवकरच देण्यात येणार आहेत.
राज्य सरकारकडून आतापर्यंत 6584 कोटी रुपये विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत. शेवटचा एक हजार कोटी रुपयाचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात विमा कंपन्याकडे जमा होईल. त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या उर्वरित नुकसान भरपाई चे पैसे मिळायला सुरुवात होईल अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या शेवटच्या 1 हजार रुपयांच्या हप्त्यासाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला होता. येत्या दोन-तीन दिवसात हा प्रस्ताव मंजूर होऊन शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
हे पण वाचा| शेतकऱ्यांनो हे कागदपत्र आहे का? तरच तुमच्या खात्यावरती ₹2000 रुपये जमा होणार
एकूण विमा हप्त्यातून नुकसान भरपाई वगळता शिल्लक रकमेतील 20% रक्कम विमा कंपन्यांना नफा म्हणून गृहीत धरले जाईल तर राज्य सरकारला या माध्यमातून तब्बल 2300 कोटीचा परताव मिळणार आहे. 2024 साली प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेअंतर्गत 863 कोटी 56 लाख रुपयाचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना द्यावे लागला होता. मात्र बनावट पीक विमा अर्ज रद्द केल्यानंतर 400 कोटीची बचत झाली होती. ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच शेतकऱ्यांना पिक विमा योजनेअंतर्गत आर्थिक सामर्थ्य दिले जाते. Crop Insurance Updates
यावर्षीपासून राज्यातून जुनी पिक विमा योजना लागू होणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना दोन टक्के प्रीमियम भरावे लागणार आहे. पिक विमा योजनेत कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये म्हणून आम्ही यामध्ये बदल केल्याची माहिती कोकाटे यांनी दिली आहे. पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली गेली होती मात्र या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर सरकारने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता नवीन पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रीमियम द्यावे लागणार आहे.
हे पण वाचा| राज्यातील या नऊ जिल्ह्यांना मुसळधार पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनो थोड सावध राहा!
शेतकऱ्यांना आता पीक विम्यासाठी खरीप हंगामात दोन टक्के रब्बी हंगामात 1.5% योगदान आणि नगदी पिकाच्या विमा योजनेसाठी 5% हिस्सा द्यावा लागत आहे. उर्वरित पीक हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. पीक पेरणी पासून काढणे पर्यंतच्या कालावधीमध्ये वीज कोसळणे गारपीट चक्रीवादळ वादळ अशा अनेक नैसर्गिक आग पूर अतिवृष्टी दुष्काळ पावसाचा खंड कीड व रोग इत्यादी बाबीमुळे पिकाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची ठरत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या बाबीचा विचार करून सुधारित पिक विमा योजना खरीप व रब्बी हंगामा करिता केवळ खालील जोखमीच्या बाबीचा समावेश करून राबविण्यात आली आहे.

1 thought on “शेतकऱ्यांना पिक विम्याचा शेवटचा हप्ता कधी मिळणार? आली महत्त्वाची अपडेट समोर..”