महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! शरद पवारांच्या गटातला नेता अजित पवार यांच्या गटात करणार प्रवेश?


Maharashtra Politics | महाराष्ट्राचं राजकारण सध्या कुठल्या दिशेने जातंय हे समजणं कठीण झालंय. पक्षाचे रंग, विचारधारा आणि मैत्रीचं गणितं क्षणात बदलतंय. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या गोटातील एक बडं नाव असलेल्या बाबाजानी दुर्राणींचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होणारा संभाव्य प्रवेश वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. विशेष म्हणजे या प्रवेशाला थेट सरकारमधीलच दुसरा घटकपक्ष, म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं स्पष्ट विरोध दर्शवला आहे. Maharashtra Politics

बाबाजानी दुर्राणी हे परभणी जिल्ह्यातील मातब्बर नेते. त्यांच्या नावाभोवती आधीपासूनच काही वाद आहेत. पाथरी नगरपरिषदेच्या जागेवर अनधिकृत बांधकाम, सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या भूखंडावर ‘बाबा टॉवर’सारखी भव्य इमारत उभी करणे, खुल्या जागेवर व्यापारी संकुल उभारणे अशा अनेक प्रकरणांमध्ये त्यांचं नाव चर्चेत आलं आहे. इतकंच नव्हे तर या सगळ्या प्रकरणांची चौकशी व्हावी, अशी मागणी याआधी विधिमंडळात झाली होती. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर या घोटाळ्यांची एसआयटी चौकशी लावण्याचे आदेश दिल्याचेही समोर आले होते.

आता बाबाजानी दुर्राणी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं समजल्यानंतर शिंदे गटातून थेट विरोधाची भूमिका समोर आली आहे. परभणीतील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नानाभाऊ टाकळकर यांनी थेट आवाज उठवत विचारलंय “या व्यक्तीविरोधात एसआयटी चौकशी जाहीर झाली होती, ती कुठपर्यंत पोहोचली? चौकशीचा अहवाल कुठे आहे?”

या घडामोडीवर अजित पवारांचं मात्र फारसं काही बोलणं झालेलं नाही. ते केवळ एवढंच म्हणालेत की, “बाबाजानी दुर्राणी यांच्यावर आरोप करणं वेगळी गोष्ट आहे, त्यावर निर्णय घेणं ही वरिष्ठांची जबाबदारी आहे.” म्हणजेच थेट आरोप फेटाळले नाहीत, पण त्यांना स्वीकारण्यातला संकोचही दाखवला नाही.

सध्या वरवर पाहता हा वाद पाथरी आणि परभणीपुरता मर्यादित असल्याचं वाटतंय. पण ज्यांनी राजकारणाच्या पडद्यामागची नाट्यं पाहिली आहेत, त्यांना हे माहित आहे की, याचं मूळ रायगडमधील त्या संघर्षात दडलंय जिथे शिंदे गट आणि अजित पवार गट आमनेसामने आले होते. आता परभणीत त्याचा दुसरा अंक रंगतोय.

भविष्यात याचा परिणाम केवळ राष्ट्रवादी किंवा शिवसेनेपुरताच मर्यादित राहील का, की सरकारच्या स्थैर्यावरही त्याचे पडसाद उमटतील, हे पाहणं रंजक ठरणार आहे. एक मात्र निश्चित महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय!

Leave a Comment

error: Content is protected !!