Beneficiary Status: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आधारस्तंभ बनली आहे. या योजनेमुळे शेतकरी मित्रांना त्यांच्या शेतीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठी मदत मिळते. दरवर्षी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपयाच्या 3 समान हप्त्यांमध्ये एकूण वर्षाला 6,000 रुपये जमा केले जातात. हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट महाडीबीटी द्वारे दर चार महिन्याच्या कालावधीनंतर जमा केले जातात. दरम्यान या योजनेअंतर्गत आतापर्यंत 19 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत यानंतर शेतकऱ्यांना 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. या हप्त्याबद्दल एक महत्त्वाची नवीन माहिती समोर आली आहे. ज्यामुळे 20 व्या हप्त्याला थोडा विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे पण वाचा| राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज..! या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी…
20 व्या हप्त्यासाठी उशीर का होणार?
पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता उशिरा जमा होण्यामागे काही ठोस कारण समोर आली आहेत. मागील काही हप्त्यांच्या वितरणाच्या तारखा पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा विशेष प्रसंगी हे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. या महिन्यात म्हणजेच जून 2025 मध्ये अशा कोणत्याही मोठ्या प्रधानमंत्री यांच्या कार्यक्रमाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे हे एक प्रमुख कारण आहे ज्यामुळे 20 वा हप्ता खात्यात जमा होण्यास उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यानंतर दुसरे कारण म्हणजे जुलै महिन्यात एकदाच पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता, आणि तो 14 वा हप्ता होता जो जुलै 2023 मध्ये वितरित झाला होता. या दोन बाबींच्या आढावा घेतल्यानंतर सध्या तरी 20 वा हप्ता नियोजित केलेल्या वेळेपेक्षा थोडा उशिरा मिळण्याची शक्यता दिसत आहे. मात्र याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा येईपर्यंत याबाबत कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नाही. मात्र सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना थोडा संयम राखणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पी एम किसान योजना 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेचे उद्देश लहान आणि गोरगरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे शेतीसाठी आर्थिक पाठबळ देणे असे आहे. या योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये 9.8 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. या हप्त्यामध्ये एकूण 22000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली होती. यामुळे शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित अनेक गरजा पूर्ण करण्यास आर्थिक मदत मिळते. Beneficiary Status
हे पण वाचा | सोन्याच्या दर 2,700 रुपयांनी घसरले; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत..
20 वा हप्ता जमा होण्यापूर्वी हे काम करा
शेतकरी मित्रांनो 20 वा हप्त्याला जरी उशीर होणार असला तरी शेतकऱ्यांनी काही गोष्टींची खात्री करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून हप्ता जमा होण्यास त्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. यासाठी खालील गोष्टीकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे.
1) ई–केवायसी पूर्ण करावी —
पी एम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणे आवश्यक आहे. ई केवायसी शिवाय कोणताही हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजून आपली ई केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी ती तात्काळ पूर्ण करून घ्यावी. तुम्ही पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन किंवा तुमच्या जवळील सीएससी केंद्राला भेट देऊन हे काम पूर्ण करू शकतात. ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे कारण याशिवाय तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही.
हे पण वाचा| LIC ची भन्नाट नवीन FD योजना; फक्त एवढी रक्कम गुंतवा आणि मिळवा दरमहा 6,500 रुपये..?
2) लाभार्थी यादीमध्ये नाव तपासा —
तुम्ही पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थी यादीमध्ये आहात का नाही हे तपासण्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तेथे तुम्हाला लाभार्थी स्थिती (beneficiary status) किंवा लाभार्थी यादी (beneficiary list) या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये आहे का नाही हे जाणून घेऊ शकतात.
3) बँक खाते आणि आधार लिंक आहे का नाही? तपासा —
तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार क्रमांक जोडलेला आहे का नाही याची खात्री करून घ्या. अनेकदा चुकीच्या बँक खात्याच्या तपशिलामुळे किंवा आधार लिंक केज नसल्यामुळे पेमेंट अडकू शकते. तुमच्या बँक शाखेत जाऊन किंवा ऑनलाईन बँकिंग द्वारे तुम्ही ही माहिती जाणून घेऊ शकता आणि आवश्यक बदल करू शकता. आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे महाडीबीटी द्वारे दिले जातात. तुमचे बँक खाते आधार सोबत लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत.
हे पण वाचा | SBI मध्ये 2 लाख रुपयांच्या FD वर किती परतावा मिळेल? जाणून घ्या सविस्तर माहिती…
पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठ्या आर्थिक मदतीचे कारण ठरत आहे. या योजनेचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांना उशिरा मिळण्याची शक्यता असली तरी शेतकऱ्यांनी काळजी न करता आवश्यक ती पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. ई केवायसी पूर्ण करणे, लाभार्थी यादीत नाव तपासणी किंवा बँक खाते आधार सोबत लिंक करणे यासारख्या असंख्य गोष्टीची पूर्तता शेतकऱ्यांना करणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व गोष्टीची पूर्तता केल्यानंतर हप्ता जारी होताच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. सरकारकडून 20 व्या हप्त्याच्या वितरणाबाबत अधिकृत घोषणा लवकरच होण्याचे अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणेसाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क साधावा.
1 thought on “मोठी बातमी! PM किसान योजनेचा 20व्या हप्त्याला उशीर होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर..”