PM Kisan Yojana: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे. या योजनेअंतर्गत दर वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरत आहे. कारण यामुळे त्यांना शेतीसंबंधीत गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा हातभार लागत आहे. सध्या देशातील शेतकरी 20 व्या हाताची प्रतीक्षा करत आहेत. या योजनेअंतर्गत पुढील हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
दरम्यान 20 वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याबाबत महत्त्वाची अपडेट आली आहे. जरी या हप्त्याची तारीख अजून अधिकृतपणे घोषित झाली नसली तरी पैसे कधीही तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का नाही हे कसे तपासायचे याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता तुम्हाला मिळाला आहे का नाही हे तपासण्याची सोपी प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत. PM Kisan Yojana
हे पण वाचा| तुर बाजारभावात मोठा चढ-उतार कोणत्या जिल्ह्यात मिळाला सर्वाधिक दर जाणून घ्या सविस्तर माहिती
पीएम किसान योजनेचे स्टेटस तपासा (pm Kisan Yojana status)
जर तुम्हाला पी एम किसान योजनेचे स्टेटस मोबाईलवर जाणून घ्यायचे असेल तर खाली स्टेप फॉलो करा.
- सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
- वेबसाईटवर गेल्यानंतर former corner या विभागात जा. तिथे तुम्हाला know your registration number हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- आता तुम्हाला आधार कार्ड नंबर किंवा तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकण्याचा पर्याय मिळेल. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका आणि त्यानंतर स्क्रीनवर दिसणारा कॅप्चर कोड अचूक भरा. यानंतर तुमचा मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी भरा.
- ओटीपी पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत क्रमांक दिसेल. या क्रमांकाची नोंद करून घ्या कारण तो पुढे स्टेटस तपासण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.
- आता तुम्ही परत former corner मध्ये जाऊन know your status या पर्यायावर क्लिक करा आणि मिळालेला नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकून तुमचे टेटस तपासा.
हे पण वाचा| घरबसल्या 5 मिनिटांत मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया
लाभार्थी यादी (beneficiary list) कशी तपासावी?
पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी पाहणेदेखील अगदी सोपे आहे तुम्ही आमच्या खाली स्टेप फॉलो करून तुमची लाभार्थी यादी पाहू शकता.
- पुन्हा एकदा सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- वेबसाईटच्या होम पेजवर former corner पर्यावर क्लिक करा.
- यामध्ये तुम्हाला बेनिफेसरी लिस्ट (beneficiary list) हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडे जिथे तुम्हाला काही माहिती विचारली आहे. यामध्ये तुमचे राज्य जिल्हा उपजिल्हा ब्लॉक किंवा ग्रामपंचायत निवडायला सांगितले आहे.
- ही सर्व माहिती भरल्यानंतर get report या पर्यायावर क्लिक करा. तुमच्यासमोर तुमच्या गावातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची यादी दिसेल. यामध्ये तुम्ही तुमचे नाव पाहू शकता.
हे पण वाचा| पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळणार; तुमच्या खात्यात जमा होणार का नाही? पहा येथे
रजिस्ट्रेशन नंबर टाकून स्टेटस कसे तपासावे?
जर तुमच्याकडे पीएम किसान योजनेचा नोंदणी क्रमांक आधीपासून असेल तर तुमच्या अर्जाचे टेटस कसे पाहावे याबद्दल स्टेप बाय स्टेप सर्व माहिती जाणून घेऊया.
- यामध्ये पुन्हा एकदा पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर या.
- होम पेजवर तुम्हाला Know your status हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक आणि कॅप्चर कोड भरायचा आहे.
- सर्व माहिती अचूक भरल्यानंतर get data बटनावर क्लिक करायचे आहे. तुमच्या स्क्रीनवर सध्याचे टेटस आणि आत्तापर्यंत जमा झालेले हप्ते याची संपूर्ण माहिती दिसेल.
हे पण वाचा| या महिलांना मिळणार 2,500 रुपये; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा…
पी एम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी येणार?
पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्यानंतर दोन हजार रुपयाचा हप्ता दिला जातो. हे आप्पे साधारणपणे तीन कालावधीत शेतकऱ्यांना दिले जातात. यामध्ये पहिला हप्ता एप्रिल ते जुलैमध्ये दिला जातो, त्यानंतर दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत दिला जातो, त्यानंतर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये दिला जातो. यानुसार विसाव्या हप्त्याची रक्कम जून महिन्यात येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता जून महिना संपण्यासाठी खूपच कमी वेळ शिल्लक राहिला आहे आणि अजूनही याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जुलै महिन्यात जमा होऊ शकतो. तरीही शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले स्टेटस तपासीत राहावे कारण पैसे कधी भेटतील सांगता येत नाही.
1 thought on “PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये कधी जमा होणार? असे चेक करा लाभार्थी यादीत तुमचे नाव”