Former ID: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरीप हंगाम 2025 26 साठी राज्य शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू केली आहे. जर तुम्हाला देखील तुमच्या पिकाचा पिक विमा काढायचा असेल तर 31 जुलै 2025 पर्यंत मुदत ठेवण्यात आली आहे. मात्र या अगोदर विमा काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आता पीक पाहणी आणि फार्मर आयडी दोन्ही अनिवार्य करण्यात आले आहे. या हंगामासाठी विविध पिकांसाठी किती विमा संरक्षण रक्कम मिळेल हे देखील घोषित करण्यात आले आहे.
पिक विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे फार्मर आयडी आहे. पिक विमा साठी अर्ज करताना हा फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पण हा आयडी नेमका कसा काढायचा? याची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला पिक विम्यासारख्या अनेक सरकारी योजनेचा लाभ सहजपणे घेता येईल. Former ID
फार्मर आयडी कसा काढावा?
फार्मर आयडी काढण्यासाठी अगदी सोपी प्रक्रिया आहे. फक्त काही गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवणे गरजेचे आहे खाली स्टेप फॉलो करून तुम्ही तुमची फार्मर आयडी सहजपणे मिळवू शकता.
हे पण वाचा | तीस वर्षांनी तयार झाला मोठा योग 3 जुलैपासून या राशींच्या आयुष्यात होणार मोठा बदल
- सर्वप्रथम तुम्हाला https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- तुम्ही जर पहिल्यांदाच फार्मर आयडी काढत असाल तर क्रियेट न्यू यूजर (create new user) या लिंक वर क्लिक करा.
- यामध्ये तुमचा आधार क्रमांक टाका त्यानंतर तुमच्या आधार नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी टाकून सबमिट करा.
- आधार ओटीपी पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुमचे नाव आणि इतर सर्व आवश्यक माहिती भरा. यामध्ये तुमची KYC माहिती देखील भरा.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे या नंबर वर तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी व्हेरिफाय करायचा आहे.
- यानंतर तुमच्या खात्यासाठी एक पासवर्ड सेट करा हा पासवर्ड टाकून तुमचे खाते ऍक्टिव्ह करा. हा पासवर्ड आणि मोबाईल नंबर तुम्हाला पुढे लॉगिन करण्यासाठी लागेल त्यामुळे तो लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा.
- एकदा खाते सक्रिय झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमचा फोन नंबर किंवा पासवर्ड वापरून लॉगिन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला KYC माहिती पुन्हा ओपन झालेली दिसेल त्यात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
- यानंतर तुमचा रहिवासी पत्ता टाका पुढील टप्प्यात land holder details असा पर्याय दिसेल त्यात तुम्हाला owner (मालक) हा पर्याय निवडायचा आहे.
- व्यवसायाच्या माहितीमध्ये तुम्हाला शेती हा पर्याय निवडायचा आहे.
- आता तुमच्या जमिनीची माहिती गट क्रमांक आणि खाते क्रमांक येथे टाका. ही माहिती टाकल्यानंतर तुमच्या जमिनीची नोंदणीकृत माहिती समोर उपलब्ध होईल.
- सर्व माहिती अचूक भरल्यानंतर verify all lands या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला महसूल मंडळाचे अप्रुव्हल मिळेल. त्यामध्ये revenue option वर क्लिक करा.
- यापुढील स्क्रीन नंतर सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वकाचा आणि त्यांना मान्यता द्या. त्यानंतर पुन्हा तुमचा आधार नंबर टाका तुमच्या फोनवर अंतिम ओटीपी येईल तो ओटीपी टाकून सबमिट करतात तुमचा फार्मर आयडी साठी अर्ज सबमिट होईल.
या सर्व स्टेप पूर्ण फॉलो केल्यानंतर तुमचा फार्मर आयडी तयार होईल. या फार्मर आयडीच्या मदतीने तुम्ही सरकारच्या पीक विम्यासारख्या अनेक योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे आता लगेच तुमचा फार्मर आयडी काढून घ्या आणि खरीप हंगाम 2025 26 चा पिक विमा वेळेत भरा. काहीही अडचण आल्यास जवळील सीएससी केंद्रामध्ये भेट देऊन तुमची पुढील प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
1 thought on “पिक विमा भरण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक! कसा काढायचा फार्मर आयडी? जाणून घ्या सविस्तर”