Oppo Reno 14 Pro Launch | स्मार्टफोन चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. Oppo ने आपले नवी स्मार्टफोन मॉडेल्स, Reno 14 Pro 5G आणि Reno 14 5G, भारतात अधिकृतपणे लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फोन कॅमेरा आणि AI क्षमतांसाठी प्रसिद्ध असून, त्यांची किंमत आणि फीचर्स बघता हे मध्यम बजेट मधील खूपच आकर्षक पर्याय ठरत आहेत. Oppo Reno 14 Pro Launch
Oppo Reno 14 Pro आणि Reno 14 किंमत
Reno 14 Pro 5G चा 12GB RAM+ 256 GB स्टोरेज व्हेरियंट किंमत 49,999 रुपये आहे. याचाच एक उच्च व्हेरिएंट 12GB RAM+ 512 GB स्टोरेज मध्ये 54,999 रुपयांना मिळणार आहे. हे Peari White आणि Titanium Grey या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.
दुसरीकडे, Reno 14 5G ची सुरुवात ची किंमत 37,999 रुपये असून तो 8GB RAM+ 256 GB स्टोरेज सह येतो. या व्यतिरिक्त 12 GB RAm + 256GB आणि 12 GB RAm+ 512 व्हेरेंट अनुक्रमणिके 39,999 रुपये आणि 42,999 रुपये किमतीत येणार आहेत. Forest Green आणि Peari White रंगात हा फोन उपलब्ध होईल. विक्री 8 जुलैपासून Oppo च्या अधिकृत वेबसाईट, Amazon आणि रिटेल स्टोअर्स सुरू होईल.
Performance आणि Display फिचर्स (Performance and Display Features)
Reno 14 Pro 5G मध्ये 6.83-इंचाचा LTPS OLED डिस्प्ले असून त्याचा रिझोल्यूशन 1.5K आहे आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. 1,200 निट्स ब्राईटनेस, Corning Gorilla Glass 7i प्रोटेक्शन, आणि ग्लोव्ह टचसारखी खास फीचर्स मिळतात. यात MediaTek Dimensity 8450 प्रोसेसर असून तो 4nm आर्किटेक्चरवर आधारित आहे. फोन Android 15 वर आधारित ColorOS 15.0.2 वर चालतो आणि Google Gemini तसेच Al Unblur, Al Recompose, Al Call Assistant आणि Al Mind Space यांसारख्या स्मार्ट AI फिचर्ससह येतो.
Reno 14 5G मध्ये थोडासा लहान 6.59-इंच OLED डिस्प्ले असून त्याच रिझोल्यूशनसह येतो. यामध्ये MediaTek Dimensity 8350 चिपसेट आहे आणि 6,000mAh बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. याचे सॉफ्टवेअर आणि कनेक्टिव्हिटी पर्याय Pro प्रमाणेच आहेत.
बॅटरी आणि इतर फीचर्स (Battery and other features)
Reno 14 Pro मध्ये 6,200mAh बॅटरी असून त्यात 80W SuperVOOC चार्जिंग आणि 50W AirVOOC वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट आहे. Reno 14 मध्ये 6,000mAh बॅटरी आहे जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, पण यामध्ये वायरलेस चार्जिंग नाही.
कॅमेरा सेटअप आणि AI ताकद (Camera setup and AI strength)
दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. Reno 14 Pro मध्ये 50MP मुख्य सेन्सरसह 50MP पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आहे जी 3.5x ऑप्टिकल झूम देते. तिसरा सेन्सरही 50MP अल्ट्रावाइड आहे. OIS सपोर्ट आणि 4K HDR 60fps व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी समर्थन देण्यात आलं आहे. सेल्फीसाठी समोर 50MP फ्रंट कॅमेरा आहे.
Reno 14 मध्येही 50MP मुख्य आणि 50MP टेलिफोटो लेन्स आहे, पण अल्ट्रावाइड सेन्सर 8MP आहे. सेल्फीसाठी 50MP कॅमेरा कायम आहे.
दोन्ही डिव्हाईस dual nano-SIM, eSIM, 5G/4G, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, GPS, USB Type-C पोर्ट, ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह येतात. दोन्ही IP66, IP68 आणि IP69 प्रमाणनासह धूळ आणि पाण्यापासून संरक्षित आहेत. Reno 14 Pro वजनाने 201 ग्रॅम आहे आणि रंगानुसार त्याची जाडी थोडी वेगवेगळी असते.
(Disclaimer | वरील दिलेली माहिती प्रसारमाध्यम व माहिती स्त्रोतांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)