PM Kisan 20th Installment: या दिवशी जमा होणार पीएम किसानचा 20वा हप्ता? शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार..


PM Kisan 20th Installment: सध्या महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काही ठिकाणी पेरण्या झाल्या असल्या तरी अनेक ठिकाणी अजूनही पेरण्या पावसामुळे रखडल्या आहेत. तर काही भागांमध्ये दुबार पेरणीची वेळ निर्माण झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना किमान दोन हजार रुपयाची तरी आर्थिक मदत पी एम किसान योजनेअंतर्गत मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. या अपेक्षेने शेतकरी 20व्या हाताची आतुरतेने वाट पाहत आहेत. जून महिन्याच्या अखेरीस हा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. आता मात्र एक नवीन शक्यता या संदर्भात समोर आली आहे. जी शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात दिलासा देऊ शकते.

या तारखेला 20 व्या हप्ता जमा होऊ शकतो

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 18 जुलै रोजी बिहार द्वारे वर जाणार आहेत. मोतीहरी इथे त्यांची एक मोठी सभा आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यावर डिजिटल पद्धतीने पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता जमा करू शकतात. त्यामुळे येत्या 18 जुलै रोजी पी एम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात. मात्र सरकारने या संदर्भात अजून अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची वाट पाहावी.

हे पण वाचा| राज्यातील या भागात धो–धो पाऊस तर हा भाग अजूनही कोरडा! जाणून घ्या पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज

तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का?

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता केवळ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव लाभार्थी यादीत नसेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुमचे नाव या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये आहे का नाही हे तपासणी अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल वरून लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे का नाही येता बसू शकतात. PM Kisan 20th Installment

  • यासाठी सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.in वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर होम पेजवर शेतकरी कॉर्नर हा पर्याय निवडावा लागेल.
  • आता लाभार्थी यादीवर beneficiary list क्लिक करा.
  • तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक योग्य ठिकाणी भरा.
  • गेट डाटा या पर्यायावर क्लिक करा. तुमच्यासमोर लाभार्थी यादी असेल त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव आहे का नाही पाहू शकता.

तक्रार कशी करावी?

तुमची ई केव्हाची पूर्ण झालेली असल्यास आणि बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केलेले असल्यास लाभार्थ्यांना रक्कम मिळण्यास कोणतीही अडचणी येत नाही. मात्र तरीही तुम्हाला पीएम किसान योजनेच्या संबंधित काहीही अडचण येत असेल किंवा आता जमा होत नसेल तर तुम्ही खालील हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधू शकता.

  • 18001155525
  • 155261
  • 01124300606

या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही तुमच्या समस्या सांगू शकतात आणि त्यावर तुमच्या समस्या मांडू शकतात.

पी एम किसान योजनेच्या नवीन बदलानुसार एका कुटुंबातील फक्त एका सदस्याला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या नवीन नियमानुसार जर एकाच कुटुंबातील पती-पत्नी मुलगा किंवा मुलगी हे सर्वजण या योजनेचे लाभ घेत असतील तर आता केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. इतर सदस्यांना यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही. केंद्र सरकारच्या या बदलांमुळे ज्या कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त सदस्य या योजनेचे लाभ घेत होते त्यांनी या नवीन नियमाची नोंद घेणे गरजेचे आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!