Banking News: जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा कोटक महिंद्रा बँकेत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या दोन्ही बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे काही काळासाठी त्यांच्या डिजिटल बँकिंग सेवा ग्राहकांना वापरता येणार नाहीत. ग्राहकांनी घाबरून जाण्याची गरज नाही कारण ही सेवा देखभाल आणि अपडेट करण्यापूर्वी बंद ठेवण्यात येत आहे. चला तर याचा ग्राहकांवर काय परिणाम होईल? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकतीच एक महत्त्वाची घोषणा केली आहे. बँकेच्या विविध डिजिटल सेवा 16 जुलै 2025 रोजी पहाटे एक वाजून पाच मिनिटे ते दोन वाजून दहा मिनिटे या वेळेत तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध नसणार आहेत. यात यूपीआय, एन ओ ॲप, IMPS, ATM, रिटेल इंटरनेट बँकिंग, RTGS, NEFT यासारख्या महत्त्वाच्या सेवा थांबवण्यात येणार आहेत. या कालावधीमध्ये एसबीआय ने ग्राहकांना यूपीआय लाईट वापरण्याचा सल्ला दिला आहे. ही सेवा कमी रकमेचा व्यवहार जलद आणि सहजपणे करण्यासाठी डिझाईन केलेला आहे.
जर तुम्हाला यूपीआय लाईट वापरायचे असेल पण कसे सक्रिय करायचे हे माहीत नसेल तर काळजी करू नका. उदाहरणार्थ जर तुम्ही गुगल पे वापरत असाल, तर ॲप उघडल्यानंतर तुम्हाला सक्रिय यूपीआय लाईट हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही आवश्यक माहिती भरून ही सेवा सक्रिय करू शकता. एसबीआय ने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर याबद्दल माहिती दिली आहे. सर्व सेवा दोन वाजून दहा मिनिटांनी पुन्हा सक्रिय होतील तोपर्यंत कोणतेही ट्रांजेक्शन करणे टाळावे अशी माहिती दिली आहे.
हे पण वाचा| सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ! जाणून घ्या तुमच्या शहरातील 10 ग्रॅम सोन्याची किंमत..
कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांनी या तारखा लक्षात ठेवा
- 17 आणि 18 जुलै रोजी रात्री बारा ते पहाटे दोन वाजेपर्यंत मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंग द्वारे NEFT सेवा बंद राहणार आहे.
- 20 आणि 21 जुलै रोजी रात्री बारा ते पहाटे 2:00 वाजेपर्यंत नेट, यूपीआय आणि मोबाईल बँकिंग सेवा उपलब्ध नसणार आहेत.
- वीस आणि 21 जुलै रोजी रात्री बारा ते पहाटे 3:00 वाजेपर्यंत पेमेंट गेटवे सेवा काम करणार नाही.
कोटक बँकेच्या ग्राहकांना विनंती आहे की जर तुमचे कोणतेही महत्त्वाचे व्यवहार असतील तर या तारखेपूर्वी व वेळेच्या आधी पूर्ण करून घ्याव्यात.
या कार्यामुळे ग्राहकांना काही वेळासाठी डिजिटल बँकिंग सेवा वापरता येणार नाही. ज्यामुळे त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. विशेषता ज्यांना रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी महत्त्वाचे व्यवहार करायचे असतील त्यांना अशा अडचणीचा सामना करावा लागू शकतो. ही सेवा तात्पुरती बंद असल्यामुळे दीर्घकाळ चालणार नाही कोणताही नकारात्मक परिणाम यातून होणार नाही. Banking News
या दोन्ही बँकांकडून घेण्यात आलेला हा निर्णय ग्राहकांच्या सोयीसाठी आणि डिजिटल सेवा अधिक सुरक्षित व चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आहे. देखभाल कार्यामुळे सेवा तात्पुरत्या बंद असल्या तरी नंतर त्या सुधारित स्वरूपात सुरू होतील त्यामुळे ग्राहकांनी दिलेल्या वेळेनुसार आपल्या आर्थिक व्यवहाराचे नियोजन करावे. जर तुम्हाला काही इमर्जन्सी व्यवहार करायचे असतील तर तुम्ही यावेळी पूर्ण करून घ्यावे.
1 thought on “या बँकेत तुमचे खाते आहे का? या दोन बँकांनी घेतला मोठा निर्णय, ग्राहकांवर काय परिणाम होणार?”