Gold Price Today | गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव आणि नागरिक आकाशाकडे डोळे लावून बसलेले आहेत. पाऊस कधी पडेल आणि शेतीमध्ये ओल होईल याची वाट सध्या शेतकरी पाहत आहे. परंतु आता तुम्हाला आणखी एक्या गोष्टीसाठी वाट पहावी लागणार आहे ते म्हणजे सोने. सोने खरेदी करण्याचा वाट पाहत आहे तुम्हाला देखील आता पावसाप्रमाणेच याचे भाव कधी कमी होतात याकडे डोळे लावून वाट पाहावी लागणार आहे. सर्वसामान्यांसाठी सोन खरेदी करण्याचा स्वप्न सध्या दूर जात आहे. कारण 22 जुलै 2025 रोजी सोन्याचा दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झालेली आहे. लग्नसराई, सणासुदीनिमित्त आपण सोने खरेदी करत असतो अशातच आता मोठा खिशाला फटका बसणार आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या भावात 600 ते 660 रुपयांची मोठी वाढ झाली. 24 कॅरेट सोन्याचा दर पुन्हा एकदा थेट एक लाखांच्या पलीकडे गेलेला आहे. Gold Price Today
जून महिन्यामध्ये सोन्याचे दर काही दिवस चढत होते, पण शेवटच्या आठवड्यामध्ये किमतीत घसरण होऊन काहीसा दिलासा मिळाला होता. लोकांनी दागिन्यांचे दुकानात फेरफटका मारायला सुरुवात केलेली आहे. पण जुलैमध्ये पुन्हा एकदा तेच चित्र आपल्यासमोर उभा राहिलेला आहे. काल 19 जुलै रोजी 24 कॅरेट सोन थेट 660 रुपयांनी महागले आणि आज 20 जुलैला दर एक लाख 40 रुपयांच्या वर गेलेला आहे. म्हणजे सोन खरेदी करणे आता मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी कठीण झालेला आहे.
शहरानुसार सोन्याचे आजचा भाव, कुठे किती महाग?
महाराष्ट्रातील मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव ठाणे या भागांमध्ये 18 कॅरेट सोने 75 हजार 30 रुपये, तर 22 कॅरेट सोने 91 हजार 700 रुपये, आणि 24 कॅरेट सोना एक लाख 40 रुपये प्रति 10 gm इतका विकला जात आहे. म्हणजे अगदी 18 जुलै च्या तुलनेत दर वाढलेले आहेत.
तर नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या भागांमध्ये 18 कॅरेट सोन्याचा दर 75 हजार 60 रुपये, आणि बाविस्कर सोन्याचा दर 91 हजार 730, तसेच 24 कॅरेट सोन्याचा दर एक लाख 70 रुपये पर्यंत विकले जाते. सोन्याचा हा दर पाहून आता लग्नात दागिने करायचे तर खूप मोठी तयारी करावी लागणार आहे.
चांदीच्या भावात देखील मोठी वाढ झाली
फक्त सोनच नाही तर, मित्रांनो चांदीचा दर देखील मोठा झपाट्याने वाढत आहे. 18 जुलै रोजी चांदीचा दर एक लाख 13 हजार 900 रुपये प्रति किलो होता. परंतु आज 20 जुलै रोजी तोच दर थेट एक लाख 16 हजार पर्यंत पोहोचला आहे. म्हणजे 2100 रुपयांची सरळ वाढ झालेली दिसत आहे.
गुंतवणूकदारांची सुवर्णसंधी?
सोन्याच्या किमतीने आता गुंतवणूकदारांचा चेहरा खुलवला आहे पण तो सर्वसामान्यांना हा एक फटका देखील आहे. दरवाढीमुळे गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे. पण सामान्य ग्राहक, जे लोक सणासुदीनिमित्त सोने खरेदी करणारे मध्यमवर्गीय आणि ग्रामीण कुटुंब मात्र मोठ्या चिंतेत आहेत. त्यांच्यासाठी आता एक मोठा फटकाच म्हणावा लागेल
अशाच नवनवीन अपडेट साठी आम्हाला फॉलो करत चला महाराष्ट्र बातमी तुमच्यासाठी असेच नवनवीन गोष्टींचे अपडेट घेऊन येणार आहे.
हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती