PM किसानचा हप्ता जाहीर! तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ₹2000 रुपये?


Pm Kisan 20th installment |  शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील केंद्र सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी खरंच एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे लवकरच तुमच्या खात्यावरती आता दोन हजार रुपये जमा होणार आहे. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांमधून सातत्याने प्रश्न सुरू होते की आमच्या खात्यावरती आमचे हक्काचे दोन हजार रुपये कधी जमा होणार. शासनाकडून याबाबत कुठलीही प्रतिक्रिया समोर येत नव्हती. परंतु अद्याप आता शासनाने तारीख जाहीर करत शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्यासाठी जाणून घेऊया सविस्तर माहिती. Pm Kisan 20th installment

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman nidhi Yojana) जाहीर झाला असून, दोन ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट ₹2000 रुपये जमा होणार आहेत. ही रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी एका विशेष कार्यक्रमांतर्गत बटन दाबून देशभरातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करणार आहे.

तुम्हाला आठवत असेल, योजना शेतकऱ्यांसाठी खरंच वरदान ठरलेले आहे. आणि या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातात. आतापर्यंत 9.8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना 19 हप्ते मिळालेले आहेत. पण यंदाचा 20 वा हप्ता खास आहे. कारण सध्या खरीप हंगाम सुरू आहे, खत अभियानांपासून मंजुरीपर्यंत प्रत्येक गोष्टी खर्चिक झाली. अशावेळी दोन हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना खरंच आठवणीत राहील.

तुमच्या खात्यात पैसे आले का कसे चेक करणार?

जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत परंतु मेसेज आला नाही किंवा तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये आलेत का नाही हे जर तुम्हाला चेक करायचा असेल तर सर्वात प्रथम काही तुम्ही मला गोष्टी लक्षात असणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेले आहे आणि तुम्ही तुमचे नाव यादीमध्ये आहे का देखील चेक करू शकता.

सर्वात प्रथम या योजनेच्या अधुकृत वेबसाईटवर जा, लाभार्थी स्थिती या पर्याय वर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर किंवा बँक खाते क्रमांक यापैकी एकता टाका.  Get Data वर क्लिक करा.

स्क्रीनवर दिसेल तुमचं नाव, आणि पेमेंट Success अशा झळकले तर समजा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालाय. नसेल, तर कारणही तिथेच दिसेल जसं की KYC अपूर्ण, बँक डिटेल्स चुकीचा असणे, किंवा खाते आधार लिंक नसणे.

ज्यांनी आजपर्यंत केवायसी केली नाही, आधार लिंक केली नाही, किंवा बँकेची माहिती चुकीची आहे अशांनी ताबडतोब ते बदल करावा. नाहीतर तुमचा हप्ता अडकू शकतो. आता हप्ता थेट खात्यात येतोय त्यामुळे मध्यस्थी कोणी नाही आणि शेतकऱ्यांना हा हप्त्याचा लाभ योग्यवेळी भेटत आहे हे लय महत्त्वाच आहे.  तसेच पैसे जमा झाल्यानंतर ऑनलाईन फ्रॉड करणारे लोक खूप जमा होती. शेतकऱ्यांनो तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का इथे क्लिक करून चेक करा लाभार्थी यादी चेक करा असे मेसेज तुम्हाला तुमच्या व्हाट्सअप वरती किंवा सोशल मीडिया वरती दिसतील त्यावरचे क्लिक करू नका नाहीतर तुमचे खाते रिकामे होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer : वरील माहिती माहितीस्त्रोच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)

हे पण वाचा | PM किसान योजनेचा 20वा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार, पण या शेतकऱ्यांना मिळणार नाही काय आहे कारण

Leave a Comment

error: Content is protected !!