शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा हप्ता उद्या मिळणार, लगेच हे काम करा अन्यथा मिळणार नाही ₹2000


Beneficiary Status: शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या म्हणजे 2 ऑगस्ट 2025 रोजी थेट बँक खात्यात जमा होणार आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत. आतापर्यंत या योजनेचे 19 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत आणि 20 वा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदय हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयाची आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ऑगस्ट 2025 रोजी जमा केला जाणार आहे. मात्र ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होण्याआधी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अवघे काही तासच तुमच्याकडे शिल्लक राहिले आहेत त्वरित खालील दिलेली सर्व कामे पूर्ण करून घ्या.

हे पण वाचा| सोनं झालं स्वस्त, सोन्याचे दर तब्बल 2100 रुपयांनी घसरले; जाणून घ्या आजचा भाव किती?

हे काम केले नसेल तर मिळणार नाही ₹2000

तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला केवायसी करणे खूपच आवश्यक आहे. पी एम किसान योजनेचा प्रत्येक हप्ता मिळवण्यासाठी केवायसी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही अजूनही केवायसी केलेली नसेल तर लगेच पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन पूर्ण करून घ्या. अन्यथा तुमच्या बँक खात्यात विसाव्या हाताचे 2000 जमा होणार नाहीत. तुम्ही केवायसी ऑनलाईन पद्धतीने करू शकता. किंवा जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन देखील केवायसी करू शकता. Beneficiary Status

केवायसी करण्याची ऑनलाईन पद्धत

  • सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • वेबसाईटच्या होम पेजवर e–kyc हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर भरा.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी मिळेल तो योग्य ठिकाणी टाका आणि तुमचा अर्ज सबमिट करा.

अशाप्रकारे अगदी घरबसल्या तुम्ही ही प्रक्रिया करू शकता. जर तुम्हाला ही प्रक्रिया करता आली नाही तर जवळील सीएससी सेंटरमध्ये जाऊन त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या अन्यथा पैसे जमा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा लाभ मिळणार नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी केली नसेल त्यांनी हप्ता जमा होण्यापूर्वी करून घ्यावी.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!