Pm Kisan: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! तुमच्या खात्यात जमा झाले ₹2000 रुपये? तुम्हाला मिळाले का चेक करा वाचा सविस्तर माहिती


Pm Kisan Yojana News | कालचा दिवस शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा होता. कारण जे शेतकरी गेल्या चार महिन्यांपासून ज्या पैशाची वाट पाहत होते ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. हे पैसे वेळेला आल्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा हातभार लागलेला आहे. काल नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंतप्रधान किसान सन्मान(PM Kisan Yojana) निधी योजनेचा 20 वा हप्ता जमा केलेला आहे. हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित झालेला आहे. सकाळी 11 वाजता वाराणसी इथून एका कार्यक्रमांमधून या हप्त्याचे वितरण करण्यात आलेले आहे. Pm Kisan Yojana News

तुम्हाला आले का चेक करा?

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तुमच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा झाले आहेत. तुम्हाला देखील

मोबाईल वरती मेसेज येतो का? जर तुमच्याकडे मेसेज आला नसेल तर तुम्ही तुमचे बँक खाते तपासा जर मेसेज आला असेल तर नक्की तुमच्याकडे पैसे जमा झालेले असतील. हा हप्ता पावसाळ्यात बियाणं, खते, औषध आणि सणासुदीनिमित्त उपयोगी पडणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे तब्बल शेतकऱ्यांना सहा महिन्यांनी हा हप्ता मिळाला आहे.

तुमचं नाव आहे का लगेच तपासून पहा!

शेतकऱ्यांनो जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर सर्वप्रथम www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावं. Farmer’s Corner मध्ये जाऊन Beneficiary List किंवा Payment Status यावरती क्लिक करून पहा. आधार क्रमांक किंवा बँक अकाउंट टाकून Get Data यावरती क्लिक करा. ते तुम्हाला माहिती पडेल की तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे की नाही. काही वेळेस सर्वर स्लो असतो, पण घाबरू नका पैसे एकदा मंजूर झाले की खात्यावर पोहोचतात.

तुम्हाला हप्ता आला नाही काय करावे

शेतकऱ्यांनो जर तुम्हाला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता आला नसेल तर काही तुम्हाला क्रमांक देत आहे. त्यावर कॉल करून तुमची तक्रार नोंदवा जेणेकरून तुमची तक्रार नोंदवली जाईल. त्यासाठी हेल्पलाइन क्रमांक 1800 115 5525 वर संपर्क करावा. किंवा PM किसान हेल्पलाइन 155261 वा 011 24300606 तिथे कॉल करावा. जर तुम्हाला यावरतीही कॉल करण्यास काही अडचण येत असेल तर नक्कीच आम्हाला खाली मेसेज करून प्रश्न विचारू शकता.

1 thought on “Pm Kisan: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! तुमच्या खात्यात जमा झाले ₹2000 रुपये? तुम्हाला मिळाले का चेक करा वाचा सविस्तर माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!