ऑगस्टच्या ‘या’ तारखेला विजांच्या कडकडाटासह होणार जोरदार पावसाला सुरुवात; वाचा पंजाबरावांचा अंदाज..


Panjabrao Dakh Havaman Andaj: जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यात दमदार पाऊस झाला मात्र गेल्या काही दिवसापासून पावसाने मोठी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ऊन सावलीचा खेळ सुरू असल्याचे दिसत आहे. सध्या राज्यात तापमानामध्ये वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मनात पाऊस पुन्हा कधी सुरू होणार, हा प्रश्न उपस्थित आहे. यासंदर्भात हवामान अभ्यासात पंजाबराव डख यांनी एक महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. जो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे. या लेखामध्ये आपण पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेणार आहोत.

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांची शेतीचे कामे, जसे की फवारणी आणि खतांची काम, 8 ऑगस्टपर्यंत पूर्ण करून घ्यावीत कारण 8 ऑगस्ट पासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हा पाऊस सुरुवातीला कर्नाटक आणि तेलंगाना मध्ये सात ऑगस्टला दाखल होणार आहे. त्यानंतर लगेच महाराष्ट्रातील कर्नाटक आणि तेलंगणाला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये म्हणजेच सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव बीड अहमदनगर पुणे कोकण परभणी लातूर नांदेड यवतमाळ आणि हिंगोली या भागामध्ये 9 ऑगस्ट पासून पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे.

हे पण वाचा| सोयाबीनच्या दरात मोठी वाढ! जुन्या सोयाबीनला सोन्याचा भाव; वाचा सविस्तर

विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी खास अंदाज

विदर्भ: पूर्व विदर्भात, (नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती) 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान या भागात जोरदार पाऊस होणार आहे. तर पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान दररोज पाऊस होणार आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj

मराठवाडा: मराठवाड्यातील नांदेड हिंगोली लातूर धाराशिव परभणी बीड जालना आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यामध्ये 8 ऑगस्ट च्या रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. 9 ऑगस्ट रोजी या भागात जोरदार पाऊस होणार आहे.

उत्तर महाराष्ट्र: धुळे नंदुरबार जळगाव तसेच नाशिक मधील सिन्नर कळवण निफाड आणि लालसुरसह जळगावातील चाळीसगाव तालुक्यात 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस होण्याचे अपेक्षा आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कोपरगाव शिर्डी राहता संगमनेर श्रीरामपूर आणि अहमदनगर शहर मध्ये आठ ते 12 ऑगस्ट या कालावधीमध्ये जोरदार पाऊस होईल, शेतीतून पाणी बाहेर पडेल असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. येणारा पाऊस विजेच्या कडकडाटासह होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विविध चमकत असताना झाडाखाली किंवा उघड्यावर थांबू नये. हा अंदाज पुढील काही दिवसात दिसणार असल्यामुळे शेताची उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावीत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!