रक्षाबंधनापूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा! आरबीआयकडून आली मोठी न्यूज वाचा सविस्तर माहिती


RBI Repo Rate : कर्ज घेत आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे कारण रक्षाबंधनापूर्वी तुमच्या खिशाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया लवकरच कर्ज स्वस्त करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. म्हणजे काय, तर गृह कर्ज, गाडी कर्ज आणि पर्सनल लोन घेतल असेल, तर तुमचा EMI कमी होऊ शकतो. जाणून घ्या सविस्तर माहिती. RBI Repo Rate

भारतीय रिझर्व बॅंक चलन विषयक धोरण माहिती (mpc) चार ते सहा ऑगस्ट दरम्यान बैठक घेणार आहे. एसबीआयच्या अहवालानुसार या बैठकीमध्ये रेपो दरात (Repo rate) थेट 25 बेसिस पॉईंट कपात केली जाऊ शकते. म्हणजे सध्या 5.50% रेपो दर 5.25% वर येईल, असे संकेत आहेत. हीच तर तुमच्यासाठी सणासुदीची गोड न्यूज आहे. आणि सर्वसामान्यांसाठी एक मोठा दिलासा देखील मानला जात आहे.

रेपो दर कमी झाला तर ग्रह कर्ज स्वस्त होईल, गाडी कर्ज, पर्सनल लोन यांचे हप्ते कमी होतील. नवीन कर्ज घेणाऱ्यांना फायदा होईल. बाजारामध्ये पैसा फिरेल आणि रोजगार खरेदी वाढेल अर्थव्यवस्था मजबूत होईल. यंदा २०२५ मध्ये आरबीआय ने आधीच तीन वेळा रेपो दरात कपात केली आहे. 25 बेसिस पॉईंट्स फेब्रुवारीमध्ये पुन्हा एप्रिलमध्ये 25 बेसिस पॉईंट, आणि जून मध्ये थेट 50 बेसिस पॉईंट कपात सहा टक्के वरून 5.50 टक्के आता तर ऑगस्टमध्ये पुन्हा कपात झाली तरी पोदर थेट 5.25% पर्यंत खाली येईल. जर तुम्ही देखील गाडी किंवा कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे खरंच आरबीआय ने रक्षाबंधनापूर्वी सर्वसामान्यांना एक मोठी भेट दिली आहे.

हे पण वाचा | UPI Transaction: फोन पे, गुगल पे वापरताय? मग 1 ऑगस्टपासून UPI व्यवहारावर किती शुल्क द्यावा लागणार? जाणून घ्या सविस्तर

Leave a Comment

error: Content is protected !!