Loan Waiver News : यंदा सुरवातीपासूनच पावसाने चांगली हजेरी लावली होती आणि अनेक हवामान तज्ञ व हवामान खात्याने यंदा राज्यात चांगल्या प्रकारचा पाऊस होईल असे देखील शक्यता वर्तवली होती. परंतु सध्या मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरीज न लावल्याने शेतकऱ्यांच्या पोटामध्ये आग पडल्यासारखी झाली आहे. त्यांचं उभ पीक जळून चाललेला आहे. अशाच परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांमधून एक मागणी पुढे येत आहे ती म्हणजे कर्जमाफी, (Farmers’ loan waiver) मायबाप सरकार आमची कर्जमाफी होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आज पार्श्वभूमी वरती राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. Loan Waiver News
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केल आहे की, राज्य सरकारची कर्जमाफी लवकर सुरू होणार असली तरी ती फक्त गरजू आणि खऱ्या शेतकऱ्यांसाठी असेल. मोठ्या हौसेने शेतकऱ्यांच्या वेशात फार्म हाऊस उभारणार यांना मात्र या योजनेतून वगळण्यात येणार आहे.
राज्य सरकारने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, जी फक्त खऱ्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना यादीत समावेश करणार आहे. कर्जमाफीचा आश्वासन दिल असला तरी सगळ्यांनाच मिळणार नाही हे सरकारने आता स्पष्ट केल आहे. बावनकुळे म्हणाले, असे शेतकरी ज्यांचं उत्पन्न भरपूर आहे, जे शहरामध्ये राहतात पण गावात फक्त नावापूर्ती शेत दाखवतात त्यांनी घेतलेल्या कर्जावर सरकार माफी देणार नाही.
जर तुम्ही खरोखर शेतकरी आहात आर्थिक दृष्ट्या अडचणीत असाल आणि शेतीतूनच उपजीविका करत असाल तरच ही कर्जमाफी तुमच्यासाठी असणार आहे. सदन शेतकऱ्यांना मात्र या योजनेतून बाजूला ठेवण्यात आल आहे.
अशाच कर्जमाफीच्या बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल ही माहिती प्रसारमाध्यम व सत्तेतल नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार आहे.