Onion Market Price: राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अनेक बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला चांगला दर मिळाला असून काही बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण देखील झाली आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. काल एक हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळवणारा कांदा आज केवळ आठशे रुपये प्रतिक्विंटल वर थांबला आहे. सणासुदीच्या तोंडावर कांद्याच्या दरातील घसरण शेतकऱ्यांसाठी निराशेजन्य आहे. मात्र लालसगाव सह अनेक बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला चांगला दर मिळाला आहे.
सोलापूर बाजार समितीमध्ये एकूण 11441 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे. परंतु मागणी कमी असल्यामुळे सरासरी दर केवळ आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला आहे. फादर कालच्या तुलनेत सुमारे दोनशे रुपयांनी घसरला आहे. कांद्याच्या दरातील या घसरलीमुळे शेतकरी निराश असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला चांगला दर मिळाला आहे. या ठिकाणी आज कमीत कमी 651 रुपये तर सरासरी 1325 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. लासलगाव मध्ये आजही उन्हाळी कांद्याला चांगला दर मिळत असल्याची दिसत आहे. Onion Market Price
हे पण वाचा| सणासुदीच्या दिवसात गोड तेल महागले! जाणून घ्या खाद्यतेलाच्या नवीन किमती..
राज्यातील इतर प्रमुख बाजारातील सरासरी दर
- नाशिक 630 रुपये
- सिन्नर 1200 रुपये
- मनमाड 1200 रुपये
- पिंपळगाव बसवंत 1325 रुपये
- पारनेर 1275 रुपये
- रामटेक 1600 रुपये
- देवळा 1200 रुपये
या शहरांमध्ये कांद्याचे दर घसरले (सरासरी दर)
- धुळे 1010 रुपये
- नागपूर 1450 रुपये
- पुणे 1050 रुपये
- मुंबई कांदा बटाटा मार्केट 1150 रुपये
- अकोला 1200 रुपये
- अकलूज 1100 रुपये
आज राज्यभरात एकूण कांद्याचे आवक एक लाख 11 हजार 367 क्विंटल झाली आहे. त्यामुळे किमतीवर अवकेचा दबाव असल्याचे दिसत आहे. काही बाजार समितीमध्ये कांदा साठा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे कांद्याच्या दरात घट होताना दिसत आहे. कांद्याच्या दरामध्ये रोज चढ-उतार होताना दिसत आहे सध्या उन्हाळी कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात बाजारात केली जात आहे. एकूण आवक वाढल्यामुळे दर घसरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कांदा विक्री करताना स्थानिक बाजाराचे दर आणि आवक याची तुलना करूनच कांदा विक्रीसाठी नेहला तर फायदा होईल.
1 thought on “राज्यातील या बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ! जाणून घ्या आजचे कांदा बाजार भाव”