Mofat Pith Giran Yojana: ग्रामीण भागात अनेक घरात आजही महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी योग्य ती संधी मिळत नाही. चूल आणि मूल आणि इतर वेळेत शेतीतील काम करणे यातच त्यांचे जीवन संपते. पण आता सरकारने अशा महिलांना सुवर्णसंधी देऊन त्यांना स्वतःची ओळख तयार करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मोफत पीठ गिरणी योजना अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून पीठ गिरणीवर अनुदान दिले जात आहे. यामधून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि घरबसल्या उत्पन्न मिळवण्याची संधी मिळवू शकतात.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना केवळ रोजगार मिळवून देणे नव्हे तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आहे. पीठ गिरणी हा एक असा व्यवसाय आहे ज्याची मागणी वर्षभर असते. प्रत्येक गावामध्ये लोक गव्हाचे ज्वारीचे बाजरीचे पीठ दळून दैनंदिन आहाराची सोय करत असतात. त्यामुळे ही गिरणी सुरू केल्यानंतर महिलांना 12 महिने रोजगार मिळू शकतो. यातून त्यांना चांगला आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. Mofat Pith Giran Yojana
किती मिळणार अनुदान?
बाजारात पीठ गिरणी खरेदीसाठी हजारो रुपये खर्च करावा लागतो. मात्र सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना फक्त दहा टक्के रक्कम स्वतः भरावी लागणार आहे. उर्वरित 90% खर्च शासनातर्फे केला जाणार आहे. उदाहरणार्थ जर पीठ गिरणी खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपये खर्च येत असेल तर त्यातील फक्त पाच हजार रुपये महिलांना द्यायचे आहेत. उर्वरित 45 हजार रुपये सरकारतर्फे दिले जाणार आहेत. एवढ्या कमी किमतीत तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करून चांगला नफा मिळवू शकता.
हे पण वाचा| लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचे ₹1500 जमा होण्यास सुरुवात! तुमच्या खात्यात जमा झाले का नाही?
आवश्यक पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना काही अटी व शर्तीचे पालन करणे आवश्यक आहे.
- सर्वप्रथम अर्जार महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे.
- अर्जदार महिलेचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे.
- अर्जदार महिला अनुसूचित जाती जमातीची असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाखापेक्षा कमी असावे.
- अर्जदार महिलांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
मोफत पीठ गिरण योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहे.
- आधार कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँक खात्याचा तपशील
- पासपोर्ट साईज फोटो
- रेशन कार्ड (असल्यास)
- अधिकृत विक्रेतेचे कोटेशन
अर्ज कसा करावा?
मोफत पीठगिरण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. या योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांनी आपल्या स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन सर्व आवश्यक कागदपत्रासह अर्ज भरावा. अर्जाची पडताळणी व कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून अनुदान मंजूर केले जात आहे. हे अनुदान थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात आहे.
या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या गावातच छोटासा व्यवसाय सुरू करून कुटुंबाचे उत्पन्न वाढवू शकतात. याशिवाय गावातील लोकांना जवळच पीठ दळण्याची सुविधा मिळेल यामुळे गावातील अर्थचक्रालाही गती मिळेल. आजच्या काळात आर्थिक स्वावलंबी बनणे महिलांसाठी खूप गरजेचे आहे. मोफत पीठ गिरणी योजना ही केवळ अनुदान देणारी योजना नसून ग्रामीण भागातील महिलांना व्यवसाय करण्यासाठी विहिरीत करणारे आणि आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवणारी अतिशय महत्त्वाची योजना आहे.