Gold-Silver Price: आज रक्षाबंधनाचा सण आहे या सणानिमित्त अनेक जण सोन्या चांदीची खरेदी करतात. बहिणीच्या हातावर राखी बांधल्यानंतर तिला सोन्याचे गिफ्ट भेट द्यायचे असते. अनेक भाऊ प्रेमाने आपल्या बहिणीसाठी प्रेमाचे दागिने खरेदी करतात. पण यंदाच्या रक्षाबंधनला सोन्याचे दागिने खरेदी करणे खूपच महागात पडू शकते. कारण यावर्षी सोन्याचे बाजार भाव खूपच कडाडलेले दिसत आहेत. तरीदेखील नऊ ऑगस्ट 2025 रोजी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी सोन्याच्या किमतीमध्ये थोडी घसरण झाली आहे. Gold-Silver Price
आज रक्षाबंधनाच्या दिवशी देशातील सराफ बाजारामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत तब्बल 1,02,080 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 93 हजार 573 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. सोन्या सोबतच चांदीच्या किमतीत देखील वाढ होत आहे. आज एक किलो चांदी खरेदी करण्यासाठी 1,15,370 रुपये द्यावे लागत आहेत. त्याचबरोबर दहा ग्राम चांदी खरेदी करण्यासाठी 1154 रुपये द्यावे लागत आहेत. तुम्ही देखील सोने चांदीची खरेदी करू इच्छित असाल तर दागिने खरेदी करण्यापूर्वी त्याची किंमत अचूक जाणून घेणे खूप महत्त्वाचे ठरते.
हे पण वाचा| मोठी बातमी! लाडक्या बहिण योजनेतून 26 लाख महिला अपात्र? तुमचे नाव आहे का?
शहरानुसार आजचे सोन्याचे दर
- मुंबई शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 93,399 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर एक लाख 1,01,890 रुपये प्रति दहा ग्राम आहे.
- पुणे शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 93,399 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,01,890 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे.
- नागपूर शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,01,890 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 93,399 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे.
- नाशिक शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 93,399 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,01,890 प्रति दहा ग्राम एवढा आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यात फरक काय आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. मात्र ते फार मऊ असल्यामुळे त्यापासून दागिने तयार करता येत नाही. म्हणूनच दुकानदार 22 कॅरेट सोने सर्वात जास्त प्रमाणात विकतात. 22 कॅरेट सोने 91 टक्के सुद्धा असते आणि यामध्ये उर्वरित इतर धातूंचा समावेश असतो. 22 कॅरेट सोन्याचा वापर सर्वात जास्त दागिने बनवण्यासाठी केला जातो. जर तुम्हाला गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी 24 कॅरेट सोने योग्य ठरू शकते. आणि जर तुम्हाला दागिने घालण्यासाठी सोने खरेदी करायचे असेल तर तुम्ही 22 कॅरेट सोन्याची निवड करू शकता.
सध्या सोन्याच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ सर्वसामान्यांच्या खिशाचा हिशोब बिघडून टाकत आहे. रक्षाबंधनासारख्या सणानिमित्त सोन विकत घेणाऱ्यांना बजेट कमी पडत असल्यामुळे सोन्या ऐवजी चांदी खरेदी करावी लागत आहे. तर काही लोक आता घ्यायचं की नंतर घ्यायचं अशा संभ्रमात आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही तर शुभतेचे प्रतीक मानले जाते. रक्षाबंधनाच्या सणानिमित्त बाजारामध्ये सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये उत्साह दिसत आहे. मात्र वाढत्या दरामुळे सर्वसामान्य ची टेन्शन वाढले आहे.