राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनो हवामान खात्याचा अंदाज पहा

Maharashtra Weather Update : खरंतर जुलै महिना हा कोरडा गेला परंतु ऑगस्ट महिना शेतकऱ्यांसाठी चांगला जाईल अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात विश्रांती घेतली होती, परंतु आता दमदार हजेरी देखील लावलेले आहे. गेल्या दोन दिवसात अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे आणि आज पहाटेपासूनच पावसाची सरी पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून उकडा जाणवत होता परंतु आता नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. Maharashtra Weather Update

हवामान खात्याच्या नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, फिरोजपुर ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा मान्सून पट्टा सक्रिय झाला आहे. तसेच कर्नाटक परिसरावर आणि बांगलादेश पश्चिम बंगाल किनार लगत 5.8 की मी उंचीवर चक्रकार वारे वाहत आहेत. यामुळे 13 ऑगस्टपर्यंत बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

राज्यात आजचा अंदाज

हवामान खात्याने राज्यामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या भागात मेघर्जनसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या भागांसाठी हवामान खात्याने Yellow Alert दिलेला आहे. मुंबई सकाळपासून हलक्या ते मध्यम सरी पडत असून वातावरण दमट आणि ढगाळ आहे. पुढील 24 तासात मुंबई ठाणे परिसरात मेघगर्जनासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती परंतु आता पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे. याच पार्श्वभूमी वरती हवामान त्यांनी सांगतात की, ऑगस्ट महिन्यात साधारण दहा दिवस ब्रेक इन मान्सून परिस्थिती निर्माण होते. यावेळी पावसाची सरासरी घटते, मात्र हा कालावधी संपल्यानंतर पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढते. आज हवामान अंदाज पाहिल्यानंत राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि कोकण या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य नियोजन करायचे आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!