Post Office Scheme | सध्या गुंतवणूक करायचं म्हटलं की आपण विचार करतो अशी एखादी योजना आहे का, जिथे गुंतवणूक करून आपल्याला फिक्स रक्कम मिळेल. तर मित्रांनो तुमच्यासाठीच ही बातमी आहे. कारण पोस्ट ऑफिस ने त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक भन्नाट योजना राबवली आहे आणि ही योजना नागरिकांना आकर्षित करत आहे. गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत जसे की शेअर मार्केट किंवा म्युचल फंड, परंतु पोस्ट ऑफिस योजना अगदी दणकट आणि जोखमीपासून दूर आहे. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्किम (MIS) आणि यात तुम्ही गुंतवणूक केली, तर दर महिन्याला निश्चित रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. Post Office Scheme
या योजनेची खासियत
ही योजना त्या लोकांसाठी खास आहे ज्यांना प्रत्येक महिन्याला पगारासारखी रक्कम हवी असते. उदाहरणार्थ जर तुम्ही आणि तुमची पत्नी मिळून जॉईन खाते उघडलं आणि दहा लाख रुपये गुंतवले, तर यामध्ये तुम्हाला 7.4% वार्षिक व्याज मिळेल म्हणजे दर महिन्याला तुम्हाला 6167 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. आणि हेच वर्षाला मिळून 74 हजार रुपये होत आहेत.
या योजनेमध्ये तुम्ही सिंगल डबल दोन्ही खाते उघडू शकता सिंगल खात्यामध्ये जास्तीत जास्त नऊ लाख रुपये गुंतवणूक करता येते आणि जॉईन खात्यामध्ये जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवणूक करता येते.
गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊ शकता इथे तुम्हाला आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती घेऊन जावे लागेल खाते उघडण्यासाठी जवळपास 1 हजार रुपये तुम्हाला लागतील.
या योजनेची म्युच्युरिटी पाच वर्ष आहे त्यानंतर वाढवता येते एक वर्षाच्या आत पैसे काढल्यास दोन टक्के दंड आणि तीन वर्षानंतर काढल्यास एक टक्के दंड अशी रक्कम भरावी लागते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेत कुठलीही जोखीम नाही सरकार हमी असल्याने
पैशाचा तणाव नाही. गावातल्या बचत गटात निवृत्त मंडळींमध्ये किंवा स्थिर उत्पन्न शोधणाऱ्यांना ही योजना खूप महत्त्वाची आहे.
