Crop Insurance: शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी समोर येत आहे. शेतकरी आपल्या शेतीत खूपच मेहनत घेत असतो. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. दरम्यान याच नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत तब्बल 30 लाख शेतकऱ्यांना 3200 कोटी रुपयांचा निधी खात्यात जमा करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम लवकरच जमा होणार आहे. ही बातमी ऐकून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद फुलला आहे.
शेतकऱ्यांच्या हिताची ही घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली असून, राजस्थानच्या झुंझुनू या ठिकाणावरून सोमवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ही रक्कम डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जाणार आहे. कार्यक्रमाला राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा केंद्रीय कृषी राज्यमंत्री भगीरथ चौधरी आणि राज्याचे कृषिमंत्री किरोरी लाल मीना उपस्थित राहणार आहेत. Crop Insurance
हे पण वाचा| मोठी बातमी! लाडक्या बहिण योजनेतून 26 लाख महिला अपात्र? तुमचे नाव आहे का?
राज्यानुसार किती निधी मिळणार?
मिळालेल्या आकडेवारीनुसार, पिक विम्याचे विभाजन खालील प्रमाणे आहे.
- मध्य प्रदेश: 1156 कोटी रुपये
- राजस्थान: 1121 कोटी रुपये
- छत्तीसगड: 150 कोटी रुपये
- इतर राज्य: 773 कोटी रुपये
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, आता दहावी निपटवण्यासाठी राज्य सरकारच्या प्रीमियम वाटायची वाट पाहिली जाणार नाही. केंद्र सरकार आपल्या अनुदानावर आधारित रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोच करणार आहे. जेणेकरून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विम्याची महिनो महिने वाट पाहायची गरज लागणार नाही. नवीन नियमानुसार खरीप 2025 पासून जर राज्य सरकारने आपला वाटा वेळेत भरला नाही तर त्यांना 12% दंड बसणार आहे. त्याचबरोबर विमा कंपन्यांनी देखील रक्कम देण्यास उशीर केलास त्यांनाही 12% दंड भरावा लागणार आहे.
पिक विमा योजना काय आहे?
प्रधानमंत्री पिक विमा योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे मुख्य उद्देश हवामानातील बदल अतिवृष्टी दुष्काळ गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे आहे. शेतकरी आता प्रेमियम भरून आपल्या पिकाचा विमा काढताना दिसत आहे. नुकसान झाल्यानंतर शासन त्यांना विमा कंपन्या मार्फत नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करते.
2 thoughts on “आनंदाची बातमी! या 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 3200 कोटी रुपयाचा पिक विमा जमा होणार? जाणून घ्या सविस्तर”