Gold Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने बदल होत आहे. मध्यंतरी अमेरिकाने भारतावरती 50% टॅरिफ लागू केल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. यामुळे सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. यापुढे आपल्याला सोनं खरेदी करणे शक्य होणार नाही कारण सोन्याच्या दर लाखांच्या वर गेलेले आहेत आणि ते काय आपल्याला परडवायचं नाही. Gold Price Today
आज सराफ बाजारामध्ये सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तब्बल एक लाख एक हजार चारशे सहा प्रति दहा ग्रॅम सर्वोच्च पातळीवर सोनं गेलं होतं. आज एक लाख दोनशे वर आला आहे म्हणजे तब्बल 741 ने घसरन झाली. जीएसटी आज 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख तीन हजार दोनशे सात रुपये प्रति दहा ग्राम आहे.
चांदीच्या दरात बदल
फक्त सोनच नाही, चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. प्रति किलो चांदी ₹424 ने स्वस्त होऊन ₹1,14,308 झाली आहे. GST सह आता दर ₹1,17,737 प्रति किलो वर पोहोचला आहे. काल जीएसटी शिवाय चांदी ₹1,14,732 वर बंद झाली होती, तर सोन ₹1,00,942 वर स्थिरावलं होतं.
14 ते 23 कॅरेट सोन्याचे दर
23 कॅरेट सोन्याचे दर 99 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 91 हजार 784 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर 18 कॅरेट सोन्याचे दर 75 हजार 151 रुपये प्रति दहा ग्राम आहे आणि 14 कॅरेट सोन्याचा दर 60,376 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
हे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर असोसिएशन (IBJA) कडून जाहीर केले असून, तुमच्या शहरानुसार ₹1,000 ते ₹2,000 पर्यंत फरक असू शकतो. IBJA, दिवसातून दोनदा दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता दर अपडेट केले जातात.
हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती