Lion Vs Crocodile Fight : सध्या सोशल मीडियावरती आपल्याला सर्व काही पाहायला मिळतात कधी काय कॅमेरमध्ये कैद होईल सांगता येत नाही. सध्या जंगलात घडणाऱ्या गोष्टींचा सौंदर्य वेगळाच असतं तिथे कोणत्याही क्षणी निसर्गाच रंगमंच बदलू शकतो. सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ मोठा धुमाकूळ घालत आहे. हिरव्यागार काठावर, हलक्या पाण्यात निवांत पडलेली एक प्रचंड मगर… आणि तिच्याकडे झुकलेल्या नजरेने सरकणारा सिंह म्हणजे जंगलाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला सिंहाला पाहून क्षणातच तणाव वाढतो. मग काय काही सेकंदात सुरू होतो मृत्यूचा खेळ सिंह विरुद्ध मगर. Lion Vs Crocodile Fight
सुरुवातीला सिंह एकटा होता, पण त्याची नजर फक्त मगरीवर होती. सावकाश पाण्याच्या टोकाशी येऊन तो मगरेला पाहत होता. मगरही शांतपणे हालचाल करत त्याच्याकडे पाहत होती. पाहता पाहता, बाकीचे सिंह ही मैदानात उतरतात. आता सिंहाची टोळी मिळून मगरीवर हल्ला चढवते. जोरदार गर्जना, पाण्याचे उडणारे तुषार पाहून प्रेक्षकांचा विश्वास रोखला जातो. त्या क्षनि सगळ्यांना वाटतं ही लढाई सिंह जिंकेल.
पण खरं तर इथेच आपल्याला एक ट्विस्ट पाहायला मिळतो. सिंहाची पकड घट्ट होत असतानाच, मगर अचानक प्रचंड शक्तीने पलटवार करते. तिचे जबडे जणू लोखंडी कडी सारखे घट्ट होतात आणि एका क्षणातच सिंहांना मागे हटायला भाग पाडतात. क्षणात सिंह पाण्याच्या टोकावरून मागे सरकतात. काही सेकंदा पूर्वीची बाजी सिंहाच्या बाजूने होती, ती आता पूर्णपणे मगरीच्या ताब्यामध्ये जाते.
या लढाईमध्ये जंगलाचा राजा हा मान टिकला नाही, उलट मगरीच्या चिकाटी आणि ताकदीसमोर त्याला माघार घ्यावी लागली. व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आणणारा हा क्षण, जंगलातील खरी राज्यसत्ता कोणाची याचा वेगळाच अर्थ सांगून जातो.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त वायरल होत आहे. लोकांच्या प्रतिक्रिया येतात शक्तिशाली आकाराने मोजू नका, मगर म्हणजे शांत पण प्राण घातक, तर काहींना तर याला जंगलातील मोस्ट एपिक बॅटल म्हटलं आहे. खरंच हा थरार पाहून तुम्हाला एक गोष्ट पटेल निसर्गाच्या रंगमंचावर कुणीही कायमचा राजा नसतो, तिथ जिंकतो तोच शेवटपर्यंत टिकतो.

1 thought on “जंगलातील सिंह-मगरीचा थरार! ‘राजा’ ही हरला, सेकंदात पलटली बाजी; Video पाहून अंगावर येईल काटा”