E–Pik Pahani: खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे काम म्हणजे पिकाची पाहणी करून घेणे. यापूर्वी हे सगळं काम तलाठ्यांच्या किंवा ग्रामसेवकाच्या मदतीने केले जात असे. पण आता काळ बदलला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ई पीक पाहणी करण्यासाठी एक मोबाईल ॲप सुरू केले आहे. या ॲपचा वापर करून शेतकरी स्वतःच्या पिकाची माहिती मोबाईल वरून ऑनलाईन भरू शकतात. ई पिक पाहणी करणे खूप महत्त्वाचे आहे. जर शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाची पाहणी केली नाही तर त्यांना पीक विम्यासारख्या सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि कृषी विभागाने एकत्र येऊन डिजिटल क्रॉप सर्वे (digital crops survey) हे ॲप तयार केले आहे. यातून शेतकरी आपल्या शेतीतील पिकाची, बांधावरील झाडांची आणि पडीक जमिनीची नोंदणी अगदी सहजपणे करू शकतात. ही माहिती थेट शासनाकडे पोहोचते आणि सरकारी नोंद अचूक राहते. ही नोंदणी कशी करावी याबद्दल ए टू झेड माहिती आपण जाणून घेणार आहोत. E-Pik Pahani
हे पण वाचा| लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती..
ई पिक पाहणी ॲप वापरण्याची पद्धत
- सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर वर जा आणि ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करा.
- त्यानंतर नवीन वापरकर्त्यांनी आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा.
- आपल्या सातबाऱ्यावरील गट क्रमांक निवडा.
- त्यानंतर लागवड केलेल्या पिकांचा प्रकार निवडा आणि ॲप मधील कॅमेऱ्याने त्या पिकांचा फोटो अपलोड करा.
- सर्व माहिती भरून सर्वे सेव करा.
ई पिक पाहणी करताना या गोष्टीचे दक्षता घ्या
- पिकांचा फोटो शेताच्या 50 मीटरच्या आतून काढणे बंधनकारक आहे.
- आता हा प्रकल्प फक्त प्रयोगिक नाहीतर संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व माहिती अचूक भरा.
- नोंदणी झाल्यावर शासनाकडे अचूक माहिती पोहोचावी यासाठी सर्व माहिती योग्य असणे गरजेचे आहे.
- नोंदणी झालेल्या पिकाची नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास मदत मिळते.
ई पिक पाहणी ॲपमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचत आहे. तलाठ्याची वाट पाहणं आणि कार्यालयाच्या फेऱ्या मारणं आता शेतकऱ्यांना याची काही गरज लागत नाही. शेतकरी घरबसल्या मोबाईलवर दोन-चार क्लिक केल्यानंतर हे काम पूर्ण करू शकतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा असा वापर करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळावा हा या मागचा हेतू आहे. पिकाचे नुकसान झाल्यास तुम्हाला सरकारकडून याचे संरक्षण मिळेल.

1 thought on “तुमच्या मोबाईल वरूनच अशी करा ई-पीक पाहणी! शेतकऱ्यांसाठी A-Z सविस्तर माहिती”