Gold Rate Today : मध्यंतरी सोन्याचा दर एक लाखांच्या पुढे गेला होता, यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करायचं म्हटलं तर डोक्याला ताप निर्माण झाला होता. परंतु, आता तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करताय तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आज बाजारातून आलेल्या अपडेट नुसार, सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. पुढे येणाऱ्या सणासुदीनिमित्त जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी एक मोठी ठरू शकते. नवीन दर काय आहे हे एकदा पहाच. Gold Rate Today
गेल्या अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांना सोने खरेदी करायचे होते व ते सोन्याच्या दरावर लक्ष ठेवून होते. परंतु आता रक्षाबंधनाच्या सलग तिसऱ्या दिवसानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली असून, खरेदीदारांसाठी एक प्रकारची सुवर्णसंधीच आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज प्रति तोळा 880 रुपयाने घसरल झाली तर दहा तोळ्यावरती ही गट 8800 रुपयांनी झाली आहे. चांदीच्या दरात देखील घसरण झाले असून प्रति किलो 2000 रुपयाने खाली आली आहे.
नवीन दर काय आहेत?
गुड रिटर्न्स च्या माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर आज एक लाख 1400 इतका आहे. काल हा दर एक लाख 2280 रुपये होता. म्हणजे 24 कॅरेट दहा तोळे सोन्याची किंमत आज दहा लाख 14 हजार आहे. जी काल दहा लाख 22800 होती. मात्र हे दर जीएसटी व मेकिंग चार्जेसपूर्वीचे आहेत, त्यामुळे प्रत्यक्षात दरात थोडासा बदल पाहिला मिळू शकतो.
22 कॅरेट सोन्याची किंमत देखील कमी झालेली आहे आज एक तोळा 22 कॅरेट सोन्याची किंमत आठशे रुपयांनी स्वस्त झाली आहे. दर 92 हजार 950 रुपयावर आले आहे तर दहा तोळ्याची दर नऊ लाख 29 हजार 500 रुपये इतका आहे. कालच्या तुलनात ही एक मोठी घट आहे.
चांदीच्या दराबाबत बोलायचं झाल्यास, आज एक ग्राम चांदी 2 रुपयांनी स्वस्त होऊन 115 रुपये झाली. तर एक किलो चांदी दोन हजाराने स्वस्त होऊन एक लाख पंधरा हजार वर आली आहे.
सराफ बाजारातील ही सलग तिसऱ्या दिवसाची घसरण पाहता, सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही एक आजची संधी मोठी असू शकते. मात्र प्रत्यक्षात बाजारात तुमच्या शहरानुसार दर एक दोन हजार रुपयांनी वेगळे असू शकतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी स्थानिक बाजारातले दर पहा.
(Disclaimer: वरील दिलेल्या दर हे अंदाजे आहेत, योग्य दर जाणून घेण्यासाठी आपल्या जवळच्या सराफ दुकानात संपर्क साधा)
1 thought on “सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचे भाव घसरले नवीन दर लगेच पहा!”