Lek Ladki Yojana: लाडक्या लेकीसाठी सरकारकडून थेट 1 लाख रुपयांची भेट! जाणून घ्या काय आहे सरकारची योजना?

Lek Ladki Yojana: मुलगी जन्माला आली की तिच्या भविष्याची प्रत्येक आई बाबांना चिंता असते. तिने चांगले शिकावे स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र अनेकदा आर्थिक अडचणीमुळे ही सर्व स्वप्न अर्धवट राहतात. अशा कुटुंबांसाठी महाराष्ट्र सरकारने एक सुवर्ण योजना आणली आहे. महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना एक लाख रुपयाचा थेट लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत कोण पात्र आहे, या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, या योजनेअंतर्गत किती लाभ मिळतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

या योजनेत पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते अठरा वर्षापर्यंत टप्प्याटप्प्यात ₹1,01,000 ची मदत सरकारकडून मिळणार आहे. हे फक्त पैसेच नाही तर तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी खूप महत्त्वाची गुंतवणूक आहे. अनेक ठिकाणी आपण पाहतो मुलगी म्हणलं की खर्च अशी मानसिकता लोकांची तयार झाली आहे. लेक लाडकी योजना 2025 ही मानसिकता मोडण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. ही योजना केवळ आर्थिक मदत देत नाही तर लेकींच्या जन्मापासून तिच्या मोठ्या होईपर्यंत सर्व खर्च सरकारकडून दिला जातो.

लेक लाडकी योजनेचे उद्दिष्टे

ही योजना सुरू करण्यामागे सरकारचे काही मुख्य उद्दिष्टे आहेत. यामध्ये मुलींचा जन्म वाढावा, स्त्रीभ्रूणहत्या टाळावी. मुलींचे शिक्षण आणि आरोग्य चांगले रहावे, लिंगभेद बालविवाह यासारख्या परंपरांना कायमचा आळा बसावा, मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे ग्रामीण भागातील मानसिकता बदलवण्यासाठी आणि मुलींना बळकट तयार करण्यासाठी ही योजना सरकारने सुरू केलेली आहे. Lek Ladki Yojana

हे पण वाचा| सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त! सोन्याच्या किमतीत ₹8,800 मोठी घसरण; जाणून घ्या 10 तोळे सोन्याचे आजचे दर

पैसे कधी आणि किती मिळणार?

या योजनेअंतर्गत पहिला टप्पा जन्मानंतर 5000 रुपयाची रक्कम मिळणार. त्यानंतर इयत्ता पहिली मध्ये मुलगी गेल्यानंतर तिला 6000 रुपयाचा दुसरा टप्पा मिळणार. पुढील टप्पा इयत्ता सहावी मध्ये गेल्यानंतर 7000 रुपयाचा मिळणार. त्यानंतर इयत्ता अकरावी मध्ये 8000 रुपयाचा टप्पा मिळणार. व सर्वात शेवटी मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपयांचा मिळणार, अशाप्रकारे एकूण मुलीला अठरा वर्षाच्या होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत.

या योजनेसाठी कोण पात्र आहे?

जर मुलीचा जन्म एक एप्रिल 2023 नंतर झालेला असेल तर त्या मुलीला या योजनेसाठी अर्ज करता येईल. कुटुंबाचे रेशन पिवळे किंवा केसरी असणे आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा कमी असणे देखील गरजेचे आहे. महाराष्ट्रात कायमस्वरूपी चे रहिवासी असणे गरजेचे आहे. वरील नियमाचे ज्या मुली पालन करतात त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • मुलीचे जन्म प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • पालकांच्या आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक पासबुक

अर्ज भरल्यानंतर अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका पडताळणी करतील. पात्र ठरल्यावर पैसे टप्प्याटप्प्याने जमा केले जातील. या योजनेतला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येत नाही पण लवकरच या योजनेचा ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे. याबाबतची नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा.

या योजनेचे फायदे काय?

  • मुलींच्या शिक्षणाचा खर्च कमी येईल आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल.
  • बालविवाहाचे प्रमाण कमी होईल.
  • गरीब कुटुंबातील मुलींना त्यांचं करियर घडवण्यासाठी सुवर्णसंधी मिळेल.
  • या योजनेमुळे समाजात सकारात्मक बदल होत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “Lek Ladki Yojana: लाडक्या लेकीसाठी सरकारकडून थेट 1 लाख रुपयांची भेट! जाणून घ्या काय आहे सरकारची योजना?”

Leave a Comment

error: Content is protected !!