या पद्धतीने सुरू करा एलपीजी गॅस सिलेंडर एजन्सी; कागदपत्र काय आणि कमाई किती?


LPG Gas Agency : सध्याच्या घडीला नोकरी करणे म्हणजे अधिक कठीण झालेल आहे. दोन-तीन वर्ष अभ्यास करून देखील यश मिळत नाही. परंतु अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर कुठे सुरू केला पाहिजे याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर मग तुम्ही एक महत्त्वाचा व्यवसाय करू शकता तो म्हणजे एलपीजी गॅस (LPG Gas Agency) एजन्सी हा एक दमदार पर्याय ठरू शकतो. कारण भारतात गॅसचा वापर झपाट्याने वाढत असून ग्रामीण शहरी भागात गॅस सिलेंडर मागणी प्रचंड वाढत आहे. आज आपण हा व्यवसाय कसा सुरू करायचा, किती खर्च येणार, कमिशन किती मिळणार आणि महिन्याचा नफा किती होऊ शकतो, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. LPG Gas Agency

गॅस एजन्सी फायदेशीर व्यवसाय?

पूर्वी ग्रामीण भागात चुलीवर किंवा रॉकेलच्या स्टोव्हवर स्वयंपाक होत असे. पण आता परिस्थिती बदलत चालली आहे. शहरी भागाप्रमाणे गावातील अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरचा वापर वाढला आहे. भारतात सध्या अंदाजे 34 कोटी एलपीजी कनेक्शन आहेत. म्हणजे ग्राहकांचा मोठा बेस तयार आहे आणि यामुळे गॅस एजन्सीचा व्यवसाय वर्षभर चालणारा आणि स्थिर कमाई देणार आहे.

एलपीजी गॅस सिलेंडरची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

एका सिलेंडर मागे मिळणारे कमिशन

घरगुती 14.2 किलोचा सिलेंडर ₹73.08 कमिशन पाच किलो सिलेंडर ₹36.54 कमिशन. या कमिशनमध्ये वाहतुकीचा खर्च समाविष्ट असतो. शिवाय गॅस एजन्सी कडून फक्त सिलेंडर विक्रीतूनच नफा मिळत नाही, तर गॅस शेगडी, पाईप्स, लाइटर, रेगुलेटर आणि इतर किचन उपकरणाच्या विक्रीतूनही चांगला नफा कमवता येतो.

गॅस एजन्सी सुरू करण्यासाठी किती खर्च लागतो?

गॅस एजन्सी सुरू करण्यासाठी सरासरी 15 लाख ते 30 लाख इतकी गुंतवणूक करावी लागते. हा खर्च शहरी किंवा ग्रामीण भागानुसार बदलतो. या खालील गोष्टी गरजेचे आहेत.

सिक्युरिटी डिपॉझिट, डिलिव्हरी वाहन, गोदाम आणि ऑफिस सेटअप, प्रारंभिक सिलेंडर स्टॉक, जर तुमच्याकडे पुरेशी गुंतवणूक नसेल तर बँकेकडून व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळू शकते.

लायसन कुठून मिळणार?

भारतामध्ये एलपीजी गॅस सिलेंडर डिलिव्हरी शिफ्ट तीन प्रमुख सरकारी कंपन्या देतात. इंडियन (IOCL), भारत गॅस (BPCL), एचपी गॅस (HPCL) या कंपन्या वेळोवेळी वर्तमानपत्रात किंवा IPGVITARAKCHAYAN.IN या पोर्टल वरती जाहिरात देत असतात. तुमच्या परिसरात डीलरशिपची जाहिरात निघाल्यावर लगेच ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज करताना दहा हजार रुपये अर्ज शुल्क भरावे लागते.

महिन्याला किती कमाई होऊ शकते ?

जर तुमच्या एजन्सीतून महिन्याला 3000 सिलेंडर विकले गेले तरी एकूण कमिशन ₹2,19,240 खर्च वजा केल्यानंतर सुद्धा सुमारे एक लाख रुपये महिना उरतो.

एलपीजी गॅस सिलेंडर हा एक दीर्घकालीन चालणारा आणि स्थिर उत्पन्न देणारा व्यवसाय एकदा एजन्सी सुरू केल्यानंतर ग्राहकांची गरज सतत असते, त्यामुळे विक्रीत मोठी चढउतार होत नाहीत. ग्रामीण भागात तर हा व्यवसाय कमी स्पर्धेत मोठा नफा देऊ शकतो. योग्य जागा, पुरेशी गुंतवणूक आणि चांगली डिलिव्हरी व्यवस्था असेल, तर एलपीजी गॅस एजन्सी महिन्याला लाखोंची कमाई करू शकते.

हे पण वाचा | मोठी बातमी ! आता या गॅस सिलेंडर धारकांना मिळणार ₹300 रुपये, वाचा सविस्तर माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!