Post Office MIS Yojana: वाढत्या महागाईमुळे घर खर्च भागवणे अनेकांसाठी कठीण झाला आहे. पगार आला की लगेच काही दिवसांमध्ये सगळी रक्कम खर्च होते आणि उरलेल्या दिवसात पूर्ण महिना घर खर्च भागवणे खूप कठीण जाते. अशावेळी जर एखादी योजना आपल्याला दरमहा निश्चित पैसे देणारे असेल आणि तीही पूर्णपणे सुरक्षित असेल तर किती भारी? अगदी यासाठीच पोस्ट ऑफिस ने मासिक उत्पन्न योजना तुमच्यासाठी सुरू केली आहे. सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असाल तर पोस्ट ऑफिसच्या योजना नेहमीच तुमच्यासाठी योग्य ठरू शकतात. अशाच एका पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीम (post office monthly income scheme— POMIS) योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
काय आहे पोस्ट ऑफिसची योजना?
पोस्ट ऑफिस मानसिक उत्पन्न योजना ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी योजना असल्यामुळे यामधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित मानले जाते. या तुम्ही एकदाच पैसे गुंतवावे लागतात आणि त्यावर तुम्हाला पुढील पाच वर्ष दर महिना व्याजाच्या स्वरूपात निश्चित उत्पन्न दिले जाते. पाच वर्षानंतर तुमची मूळ रक्कम परत मिळते म्हणजेच मूळ रकमेसोबत दर महिन्याला सुरक्षित उत्पन्न देखील मिळते. सध्या या योजनेअंतर्गत वार्षिक 7.4% व्याजदर दिला जातो. यामध्ये खाते वैयक्तिक पद्धतीने उघडल्यास कमाल मर्यादा नऊ लाख रुपये आहे. आणि संयुक्त खाते उघडल्यास कमाल मर्यादा 15 लाखापर्यंत आहे.
दरमहा किती उत्पन्न मिळेल?
जर तुम्ही या योजनेत 3 लाख रुपये जमा केल्यास दरमहा 1850 रुपये व्याज मिळेल.
जर तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये जमा केल्यास दरमहा 3093 रुपये मिळतील.
जर तुम्ही या योजनेत 9 लाख रुपये जमा केल्यास दरमहा 5550 रुपये लाभ मिळेल
जर तुम्ही या योजनेत संयुक्त खाते उघडून 15 लाख रुपये जमा केल्यास दरमहा 9250 निव्वळ व्याजातून उत्पन्न मिळेल. Post Office MIS Yojana
हे पण वाचा| SBI ची जबरदस्त योजना! फक्त एकदाच गुंतवणूक करा अन् 10 वर्षे मासिक उत्पन्न मिळवा..
अशा पद्धतीने दर महिन्याला ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल. तुम्हाला ही रक्कम पाच वर्षापर्यंत मिळत राहील आणि शेवटी तुम्ही जमा केलेली रक्कम आहे तशी तुम्हाला परत मिळेल.
योजना कोणाच्या फायद्याची?
- ही योजना निवृत्ती घेतलेल्या जेष्ठ नागरिक ज्यांना दरमहा घर खर्चासाठी स्थिर उत्पन्न हवे आहे. यांच्यासाठी फायद्याची ठरू शकते.
- घरगुती महिला ज्यांना सुरक्षित ठेवीतून व्याज उत्पन्न दर महिन्याला हवे आहे.
- लहान व्यवसायिक जे थोडी बचत करून बाजूला ठेवतात त्यांना त्या रकमेवर दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळेल.
- ज्या लोकांना शेअर बाजाराचा धोका नको आहे त्यांना देखील ही योजना खूप फायद्याची ठरेल.
योजनेच्या महत्त्वाच्या अटी
- जमा रकमेवर कर सवलत मिळत नाही.
- मिळणारे व्याज कराच्या कक्षेत येते.
- पहिल्या वर्षी पैसे काढण्यास मनाई आहे.
- पाच वर्षे पूर्ण होण्याआधी पैसे वाढल्यास कपात (पहिल्या तीन वर्षात दोन टक्के नंतर एक टक्के)
पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे गणित समजून घेऊया
समजा तुम्ही निवृत्त झाला आहात, तुमच्या सेवानिवृत्ती निधीतून 15 लाख रुपये वेगळे ठेवले आणि ते पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेमध्ये गुंतवले, तर तुम्हाला पुढील पाच वर्ष दरमहा 9250 रुपये मिळतील. यामुळे तुमचा पगार थांबला असला तरी दर महिन्याला घर खर्च भागवण्या पुरते पैसे सहज तुम्हाला मिळवता येतील. आणि तुमची मूळ रक्कम देखील पूर्णपणे सुरक्षित राहील. जर जीवनात स्थिर उत्पन्न हवे असेल तर पोस्ट ऑफिस ची मंथली इन्कम योजना उत्तम पर्याय आहे.

1 thought on “पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेमध्ये फक्त एकदाच पैसे जमा करा आणि दरमहा ₹9,250 मिळवा..”