RBI New Rules: भारतीय रिझर्व बँकेकडून देशातील बँक ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत आपण चेक जमा केल्यानंतर त्याची रक्कम खात्यात येण्यासाठी दोन दिवस वेळ लागत होता. पण आता ही प्रक्रिया सोपी झाली असून आरबीआयच्या नवीन नियमानुसार काही तासातच चेक क्लियर होऊन पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. आतापर्यंत चेक क्लिअर प्रक्रियेत कागदी स्वरूपातील धनादेश बँका दरम्यान पोचवणे तपासणे आणि त्यानंतर व्यवहार पूर्ण होण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी लागत असे. त्यामुळे मोठ्या रकमेचा व्यवहार करणाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. मात्र आता आरबीआयच्या नवीन बँकिंग प्रणालीत मोठा बदल करण्यात आला आहे. सेटलमेंट ऑन रिलायझेशन या संकल्पनेनुसार आता डिजिटल स्कॅनिंग द्वारे चेक क्लिअर करण्यासाठी नवीन पद्धत जाहीर केले आहे.
काय आहे नवीन प्रक्रिय?
आरबीआयच्या नवीन नियमानुसार चेक मिळताच बँक त्याचा स्कॅन करून थेट क्लिअरिंग साठी पाठवणार. सकाळी दहा वाजेपासून सुमारे चार वाजेपर्यंत एकाच सत्रात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यामुळे कागदाची देवाणघेवाण पोस्ट किंवा कुरिअरची पद्धतही संपेल आणि क्लिअरिंग जलद गतीने होईल. आरबीआयच्या या निर्णयामुळे वेळेची बचत होईल आणि बँकेतील चेकचे काम काही तासांमध्ये पूर्ण होईल. RBI New Rules
हे पण वाचा| SBI च्या ग्राहकांना मोठा धक्का! 15 ऑगस्टपासून ‘या’ सेवेसाठी द्यावे लागणार शुल्क, वाचा नवीन नियम
दोन टप्प्यात होणारा अंमलबजावणी
- पहिला टप्पा: चेक मिळाल्यानंतर बँकेने संध्याकाळी सात वाजेपर्यंत स्वीकारल्याची सृष्टी द्यावी लागेल. जर बँकेने काही प्रक्रिया दिली नाही तर चेक आपोआप स्वीकारलेला समजला जाईल आणि प्रक्रिया सुरू होईल.
- दुसरा टप्पा: चेक मिळाल्यानंतर फक्त तीन तासाच्या आत पृष्टी द्यावी लागेल दृष्टी मिळतात ग्राहकांच्या खात्यात तात्काळ रक्कम जमा करावी लागणार आहे.
ग्राहकांना होणार मोठा फायदा
या बदलत्या नियमामुळे मोठ्या रकमेचे व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांना आणि सर्वसामान्य ग्राहकांना त्यांचे पैसे त्वरित मिळतील. व्यवहार वेळेत पूर्ण होतील आर्थिक मनोरंजन सोपे होईल आणि जास्त वेळ थांबण्याची गरज भासणार नाही. बँकांनाही ठराविक वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याची शक्ती राहील ज्यामुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमता अधिक वाढेल. आर्थिक तज्ज्ञांच्या मते हा बदल भारतीय बँकिंग क्षेत्रासाठी सकारात्मक ठरेल. आज चेक जमा केला आता पैसे येण्यासाठी उद्या किंवा परवा थांबावे लागणार नाही तर ग्राहकांना आज दिलेल्या चेक आजच पैसे वापरायला मिळणार आहेत.
रिझर्व बँकेने हा निर्णय बँकिंग सेवेत नवा वेग आणण्यासाठी आणि ग्राहकांना अधिक सुलभ सुविधा मिळावी यासाठी घेतला आहे. यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल. आता चेक जमा करण्याची प्रक्रिया दिवसावरून तासावर आली आहे त्यामुळे ही बँकिंग क्षेत्रातील मोठी क्रांती मानली जाते.
1 thought on “RBI कडून ग्राहकांना गुड न्यूज! आता हे काम करण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही तर लगेच पैसे खात्यात जमा होणार”