PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे पैसे वाढणार? या तारखेला 21वा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता


Pm Kisan Yojana: देशभरातील लाखो शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आर्थिक आधार मिळतो. या योजनेअंतर्गत वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपये थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. ही योजना लोकांच्या उपजीविकेचा आधारस्तंभ बनली आहे. मात्र यंदा विसावा हप्ता शेतकऱ्यांना दोन महिने उशिरा मिळाल्यामुळे 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित होत आहे. Pm Kisan Yojana

21 वा हप्ता कधी मिळणार?

पी एम किसान योजनेअंतर्गत विसावा हप्ता जून महिन्यात शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होता. मात्र विसावा हप्ता ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. तांत्रिक अडचणीमुळे झालेला हा विलंब शेतकऱ्यांच्या खिशाला आणि मनाला धक्का देणारा ठरला आहे. विसावा हप्ता उशिरा आल्यामुळे 21 वा हप्ता देखील उशिरा येणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार ऑक्टोबर मध्ये २१ वा हप्ता शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. मात्र विसाव्या हप्त्यांमध्ये झालेल्या विलंबामुळे 21 वा हप्ता देखील लांबणीवर जाऊ शकतो. अद्याप सरकारकडून याबाबत अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना काही दिवस अजून प्रतीक्षा करावी लागू शकते.

हे पण वाचा| लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर..

हप्त्यात वाढ होणार अफवा की सत्य?

गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एकच चर्चा होत आहे. की पीए किसान योजनेचा हप्ता वाढणार आहे. बजेट पूर्वी यासंदर्भात मोठ्या घोषणा होतील अशा बातम्याही सुरू होत्या. मात्र कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या हप्ता वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे आला नाही. योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 20 हप्त्यासाठी तब्बल 3.9 लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत विसाव्या हप्त्यासाठी जवळपास 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट महाडिबीटी द्वारे दोन हजार रुपये पोहोचले आहेत.

21 वा हप्ता खात्यात येण्यापूर्वी हे काम करा

पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे केवायसी पूर्ण करणे. जर तुमची पी एम किसान योजनेची केवायसी पूर्ण नसेल तर तुम्हाला 21व्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे ऑनलाईन पोर्टलवर जाऊन किंवा जवळील csc सेंटरवर जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. लागू होणार आहे तसेच जमीन नोंदणी आधार क्रमांक आणि बँक खात्याची माहिती अपडेट ठेवणे गरजेचे आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केवळ आर्थिक मदत नसून, शेतकऱ्यांच्या महिनतिचा सन्मान आहे. आर्थिक मदत जरी थोडी असली तरी वेळेवर मिळणं हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. पावसावर हवामानावर आणि बाजारभावावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना अशा योजनेतून मिळणारी निश्चित रक्कम त्यांच्या घर खर्चासाठी आणि शेती खर्चासाठी नक्कीच उपयोगी ठरत आहे. सरकारने वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकावेत ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे पैसे वाढणार? या तारखेला 21वा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता”

Leave a Comment

error: Content is protected !!