E-Pik Pahani: शेतकरी मित्रांनो खरीप हंगामाची सुरुवात जोरात झाली आहे. शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकरी आता चांगल्या पावसाची वाट पाहत आहेत. पण यंदा सरकारने नवीन नियम आणले आहेत. जे शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. यंदापासून पिकाची पाहणी फक्त तोंडी सांगून किंवा गावातल्या तलाठ्याच्या वहीत करून होणार नसून थेट मोबाईलवर ॲप द्वारे करावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये ई पीक पाहणी डीसीएल 4.0.0 हे ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करावे लागणार आहे.
ई पिक पाहणी करण्यासाठी अंतिम तारीख लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ही मोहीम एक ऑगस्टपासून सुरू झाली असून १४ सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. या तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंदणी केली नाही तर पिक विमा अनुदान व इतर शासकीय योजनेचा लाभ घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणजेच पिकाला जर काही झालं तर विम्याचे पैसे मिळणे अशक्य होईल. त्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे.
ॲपद्वारे ई पिक पाहणी कशी करावी?
- सर्वप्रथम प्ले स्टोअर वर जाऊन ई पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करा.
- त्यानंतर आधार क्रमांक आणि त्याच्याशी जोडलेला मोबाईल नंबर टाकून लॉगीन करा.
- मग आपल्या शेताची माहिती — क्षेत्रफळ पेरणीची तारीख बांधावर असलेले झाड, पडीक किंवा चालू पर क्षेत्र सर्व माहिती अचूक भरा.
हे पण वाचा| लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! आदिती तटकरेंनी केली मोठी घोषणा…
यावर्षी ई पिक पाहणी करण्यासाठी नवीन नियम आला आहे. शेताच्या सीमेजवळून 50m च्या आतून दोन पष्ट फोटो काढून ॲपवर अपलोड करणे आवश्यक करण्यात आले आहे. हे फोटो पिकाची खरी स्थिती दाखवतील आणि सरकारी नोंदीत तुमच्या शेताची खात्रीशीर नोंद होईल. माहिती भरताना काही चूक झाली तर 48 तासाच्या आत ॲप वरून दुरुस्त करता येईल. इंटरनेट नसतानाही तुम्ही माहिती भरू शकता आणि नंतर नेटवर्क मिळाल्यानंतर ती आपोआप अपलोड करता येईल.
ज्या शेतकऱ्यांना मोबाईल ॲप वर ई पीक पाहणी करणे अवघड वाटत आहे. अशा शेतकऱ्यांसाठी प्रत्येक गावात कृषी विभागाकडून सहाय्यक नेमला जाणार आहे. ते तुम्हाला प्रत्यक्ष दाखवून फोटो काढून नोंदणी कशी करायची ते समजून सांगतील. त्यामुळे मला मोबाईल कळत नाही आणि मी ई पीक पाणी कसे करू असे म्हणून चालणार नाही. E-Pik Pahani
ई पिक पाहणी मुळे सरकारकडे राज्यातील पिकाची खरी माहिती प्राप्त होते. ह्याच माहितीच्या आधारावर पिक विमा, अनुदान, बियाणे, खत आणि आपत्ती मदत ठरवली जाते. म्हणजेच वेळेत नोंदणी करणे म्हणजेच आपल्या पिकाचे संरक्षण योग्य वेळी करणं असं आहे. आज मोबाईलवर दोन क्लिक करून आपण आपल्या पिकाचा मेहनतीचा आणि हक्काचा पैसा सुरक्षित करू शकतो. उशीर केला तर नुकसान तुमचंच होणार आहे. लगेच आपल्या पिकाची ई पिक पाहणी करून घ्या.
2 thoughts on “ई-पीक पाहणीचं नवीन मोबाईल ॲप आलं! पीक नोंदणी उशिरा केली तर नुकसान तुमचंच..”