Gold-Silver Price: सोन्याचे दर ऐकून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, 10 ग्रॅमची किंमत पाहून बाजारात गर्दी!


Gold-Silver Price: गेल्या काही दिवसापासून सोन्याचे दर गगनाला भिडले होते. दररोज सोन्याचे दर वाढत असल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत होता. लग्नसराई सणासुदीचा हंगामाला की लोक दागिने खरेदी करत असतात. पण सोनं महाग झाल्यामुळे अनेक जणांनी खरेदी करण्यास टाळाटाळ केली होती. मात्र आज 19 ऑगस्ट 2025 रोजी सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला आहे. त्यामुळे बाजारामध्ये सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे.

आजचे सोन्या-चांदीचे बाजार भाव

बुलियन मार्केटच्या ताज्या अपडेट नुसार, आज देशात दहा ग्राम 24 कॅरेट सोन्याचा दर 99 हजार 620 रुपये झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 91,318 प्रति दहा ग्रॅम एवढा झाला आहे. त्याचबरोबर चांदीच्या भावातही बदल झाल्याचा पाहायला मिळत आहे. एक किलो चांदी खरेदी करण्यासाठी एक लाख 13 हजार 750 रुपये द्यावे लागत आहेत. तसेच दहा ग्रॅम चांदी खरेदी करण्यासाठी 1137 रुपये द्यावे लागत आहेत. Gold-Silver Price

हे दर फक्त सुचक आहेत, प्रत्यक्षात तुमच्या शहरात दागिने खरेदी करताना जीएसटी मेकिंग चार्जेस आणि इतर करांमुळे किमतीत थोडाफार फरक आढळू शकतो.

हे पण वाचा| महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच घोषणा करणार?

तुमच्या शहरातील सोन्याचे दर

शहर22 कॅरेट (दहा ग्रॅम)24 कॅरेट (दहा ग्रॅम)
मुंबई91144 रुपये99430 रुपये
पुणे91144 रुपये99430 रुपये
नागपूर91144 रुपये99430 रुपये
नाशिक91144 रुपये99430 रुपये

22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये काय फरक असतो?

सोने खरेदी करताना नेहमी प्रश्न पडतो बावीस कॅरेट खरेदी करावी की 24 कॅरेट सोने यामध्ये नेमका फरक काय आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

  • 24 कॅरेट सोने: 99.9% शुद्ध सोने हे सर्वात शुद्ध मानले जाते. पण शुद्धतेमुळे ते मऊ असतं. त्यामुळे यापासून दागिने बनवणे शक्य होत नाही हे बहुतेक गुंतवणुकीसाठी वापरले जाते.
  • 22 कॅरेट सोने: 22 कॅरेट सोने सुमारे 91 टक्के शुद्ध मानले जाते. यात तांबे चांदी जस्त यासारख्या धातूंचा समावेश असतो. त्यामुळे ते कठीण आणि टिकाऊ होते. दागिने बनवण्यासाठी जास्त प्रमाणात या सोन्याचा वापर केला जातो.

सोन्याचे दर काही दिवसापूर्वी एक लाख रुपयाच्या पुढे गेले होते त्यामुळे ग्राहकांनी खरेदी करणे टाळले होते. मात्र आज सोन्याच्या भावात किंचित घसरन झाल्यामुळे पुन्हा एकदा सराफ बाजारामध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे. कधी सोन्याचे भाव कमी होतील या अपेक्षेने असलेल्या ग्राहकांनी आणि गुंतवणूकदारांनी लगेच सोने खरेदी करावी. एक सराफ दुकानदाराने सांगितले की सोन्याचे दर किंचित घसरले की लगेच लोक दागिने खरेदी करण्यासाठी येतात. लग्नसराई आणि सणासुदीचा काळ जवळ असल्यामुळे बाजारात पुन्हा एकदा चैतन्य आणि गर्दी वाढली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “Gold-Silver Price: सोन्याचे दर ऐकून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, 10 ग्रॅमची किंमत पाहून बाजारात गर्दी!”

Leave a Comment

error: Content is protected !!