Ladki Bahin Yojana: महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय


Ladki Bahin Yojana: महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरवातीपासूनच खूप चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. पण फक्त आर्थिक मदत नाही तर महिलांना स्वलंबी बनवण्यासाठी सरकारने आणखीन एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार गाव तालुका आणि जिल्हा पातळीवर पतसंस्था सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात महिलांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. सरकारने ठरवले आहे की गावोगावी किंवा तालुक्यात नव्हे तर केवळ जिल्ह्याच्या पातळीवर एक पतसंस्था सुरू करण्यात येणार आहे.

लाडक्या बहिणीसाठी ही पतसंस्था सुरू करण्यामागे काही महत्त्वाच्या अटी ठेवण्यात आल्या होत्या. त्यानुसार किमान 15000 महिला प्राथमिक सभासद असायला हव्या होत्या आणि सुरुवातीला दहा लाख रुपयांचे भांडवल उभे करावे लागणार होते. इतके मोठे आव्हान उचलायला कुठल्याच महिला किंवा बचत गटांनी पुढाकार घेतला नाही. Ladki Bahin Yojana

हे पण वाचा| सोन्याचे दर ऐकून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, 10 ग्रॅमची किंमत पाहून बाजारात गर्दी!

राज्य सरकारने आठ मार्च 2019 रोजी परिपत्रक जारी करून नोंदणीची प्रक्रिया ठरवली होती.

  • वार्ड विभागासाठी किमान हजार महिला आणि पंधरा लाख भांडवल.
  • महानगरपालिकेच्या इतर क्षेत्रासाठी 800 महिला आणि 10 लाख रुपये
  • मुंबई व नवी मुंबई साठी 2000 महिला आणि तब्बल 30 लाख रुपये भांडवल.

मात्र एवढे मोठे भांडवल उभा करणे अनेकांसाठी अशक्य ठरत आहे. त्यामुळे महिलांचा उत्साह कमी झाला आणि शेवटी हा निर्णय बदलावा लागला.

सरकारचं मूळ नियोजन असं ठरलं होतं की, गावागावातील महिला बचत गटावर आधारित पतसंस्था सुरू करायच्या. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना सहज कर्ज आर्थिक मदत आणि बचतीची संधी निर्माण होईल. पण अपेक्षाप्रमाणे महिला पुढे आल्या नाहीत. त्यामुळे आता या परिस्थितीत प्रत्येक जिल्ह्यात एकच पतसंस्था सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिला सहभागी होणार आहेत.

दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ महिलांच्या हातात थोडासा दिलासा नक्कीच देतो. मात्र जर पतसंस्था खऱ्या अर्थाने सुरू झाल्या असत्या तर त्यातून महिलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळू शकले असते. सध्या मात्र कठीण अटीमुळे आणि अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे सरकारने हा मार्ग बंद केला आहे. आता जिल्ह्यात स्तरीय पतसंस्था सुरू करण्याच्या निर्णयामुळे काही प्रमाणात महिलांना आधार मिळेल. पण प्रत्येक गावातील आणि खेड्यातील महिलांना त्याचा फायदा किती पत मिळेल हे पाहण्यासारखे राहणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “Ladki Bahin Yojana: महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय”

Leave a Comment

error: Content is protected !!