Namo shetkari Yojana 7th installment : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आलेले आहे. जर तुम्ही देखील राज्य सरकारच्या नमो शेतकरी महा सन्मान (Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana) निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, तुम्हाला अद्याप या योजनेचा सातवा हप्ता मिळाला नसेल तरी बातमी वाचणे खूप गरजेचे आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम कधी जमा होणार असा प्रश्न वारंवार शेतकऱ्यांमधून उपस्थित केली जात आहे .परंतु याबाबत आता एक मोठी अपडेट आपल्याला मिळाली आहे. त्यासाठी हा लेख सविस्तरपणे वाचा. Namo shetkari Yojana 7th installment
शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. कधी अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस अशा संकटांना तोंड देत असताना शेतकऱ्यांना मोठे संकटांना सामोरे जावे लागते. यात पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना कुठेतरी आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. ही समस्या डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना राबवली ती म्हणजे नमो (Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana) शेतकरी महा सन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते, ही मदत दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातात. महत्त्वाचे म्हणजे ही योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान (Pm Kisan) योजनेच्या पार्श्वभूमी वरती राबवण्यात आलेले आहे. जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
मंग पी एम किसान योजनेचा तर हप्ता दोन ऑगस्ट 2025 रोजी जमा झाला. मग आता राज्य सरकारच्या या योजनेचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत आणि या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही रक्कम वर्ग करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. राज्य शासनाकडून अध्यात कुठलीही माहिती समोर आलेली नाही परंतु काही प्रसार माध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनुसार शासन ही रक्कम लवकरच वर्ग करेल अशी शक्यता आहे.
नमो शेतकरी योजना म्हणजे काय ? (What is Namo Shetkari Yojana?)
महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी (Pm Kisan) योजनेच्या आधारावरती शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देणारी नमो शेतकरी महा सन्मान((Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana) निधी योजना राबवली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षासाठी सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो तसेच पी एम किसान योजनेच्या योजनेतून देखील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. म्हणजे शेतकऱ्यांना वर्षाकाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून 12000 रुपये थेट खात्यामध्ये मिळतात.
नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी यादीत नाव पहा? (See your name in the beneficiary list of Namo Shetkari Yojana?)
सर्वात प्रथम हा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो तर याचे उत्तर आहे जे शेतकरी pm Kisan योजनेमध्ये लाभार्थी आहेत महाराष्ट्रामध्ये राहतात त्याच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळतो. आणि या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचा अर्ज करण्याची गरज नाही हे शेतकरी आपोआप या योजनेमध्ये सहभागी होतात. यादीमध्ये नाव पाहण्यासाठी सर्वात प्रथम या योजनेच्या nsmy.mahait.org किंवा विभागाच्या वेबसाईटवर जाऊन मोबाईल नंबर किंवा रजिस्टर नंबर टाकून तुमचे हप्ते आलेत का नाही हे पाहता येते आणि यादीत नाव आहे काही पाहता येते.
नमो शेतकरी योजनेचा 7 वा हप्ता कधी मिळणार? (When will the 7th installment of Namo Shetkari Yojana be available?)
मित्रांनो अनेक प्रसारमाध्यमांमध्ये अशी देखील वर्तवण्यात येत आहे की हप्ता दोन दिवसात जमा होणार किंवा काही माध्यमांमध्ये अशी देखील वर्तवण्यात आली होते की पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता जमा करण्यात येईल. परंतु आतापर्यंत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही. तर काही प्रसार माध्यमांच्या माध्यमातून अशी देखील सांगण्यात येत आहे की शासनाकडे निधीची कमतरता असल्यामुळे हा हप्ता जमा होण्यास विलंब होत आहे. शासनाकडे आधीच लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरी वरती मोठा ताण आलेला आहे आणि हा निधी उपलब्ध करण्यासाठी शासनाला मोठे तडजोड करावी लागत आहे. त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा देखील मोठा प्रश्न उपस्थित असल्याने शासन मोठ्या आर्थिक कोंडीमध्ये सापडलेले आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता कधी जमा होणार याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.
(वरील दिलेली माहिती ही अनेक प्रसार माध्यमांच्या आधारे आहे.)
हे पण वाचा | नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यात वाढ होणार; नमोचा पुढील हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर…