Today Gold Rate: सणासुदीच्या दिवसाला सुरुवात झाली आहे. अवघ्या दोन दिवसात गणपतीच्या आगमन होणार आहे. घरोघरी गणेश मूर्तीची खरेदी त्याचबरोबर सोन्याच्या दागिन्याची खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. कारण गणेश उत्सव हा शुभ दिवस मानला जातो या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंब सोनं चांदी खरेदी करण्यास प्राधान्य देतात. दरम्यान आजच्या बाजारभावाने सोने चांदी खरेदी करण्यासाठी मोठा दिलासा दिला आहे. मागील काही दिवसापासून सोन्याच्या भावात चढ-उतार सुरू होता. कधी हजार रुपयांनी वाढ तर कधी अचानक घसरण अशी परिस्थिती पाहायला मिळत होती. पण आज गणपतीच्या मुहूर्तावर सोन्याचे भाव घसरले असून खरेदीसाठी ग्राहकांची तुडुंब गर्दी दिसत आहे.
आजचे सोन्याचे दर
- 24 कॅरेट सोने: 1,01,510 रुपये प्रति दहा ग्रॅम
- 22 कॅरेट सोने: 93,050 रुपये प्रति दहा ग्रॅम
- 18 कॅरेट सोने: 76,140 रुपये प्रति दहा ग्रॅम
हे पण वाचा| लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! ई-केवायसी करावीच लागणार, अन्यथा ₹1500 येणार नाहीत
22 कॅरेट सोन्याचा दर
22 कॅरेट सोन्याच्या किमतीत तब्बल 100 रुपयाची मोठी घट झाली आहे.
- 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने: 93,050 रुपये
- 22 कॅरेट 8 ग्रॅम सोने: 74,440 रुपये
- 22 कॅरेट 10 तोळे सोने: 9,30,500 रुपये
18 कॅरेट सोन्याचा दर
18 कॅरेट सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे.
- 18 कॅरेट 10 ग्रॅम सोने: 76,140 रुपये
- 18 कॅरेट 8 ग्रॅम सोने: 60,912 रुपये
- 18 कॅरेट 10 तोळे सोने: 7,61,400 रुपये
आजचे चांदीचे दर
आज चांदीचे दर देखील घसरले आहेत. साधारणपणे प्रति किलो चांदीचा दर घसरलेला असून, अधिकृत दर अजून समोर आले नाही. मात्र चांदीचे दर घसरल्यामुळे ग्राहकांना निश्चित फायदा होणार आहे. गणेश उत्सव नवरात्र दिवाळी या सणापूर्वी सोने चांदीचे खरेदी मोठ्या प्रमाणात केले जाते. अशात भाव कमी झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषता सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी हा सुवर्णकाळ आहे. Today Gold Rate
1 thought on “Today Gold Rate: गणेशोत्सवाआधी सोनं चांदी झाले स्वस्त, 10 ग्रॅम साठी किती पैसे मोजावे लागणार?”