Post Office FD Scheme: प्रत्येकाला आपल्या भविष्यात सुरक्षितता निर्माण करण्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करावी अशी अपेक्षा असते. घरातील सुख सोयी मुलांच्या शिक्षणासाठी किंवा भविष्यात घर बांधण्यासाठी पैसे जमवण्याचे असतील तर सर्वात पहिला प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे सुरक्षित गुंतवणूक कुठे करावी? कारण आपले कष्टाचे पैसे जखमेत घालण्याची हिंमत फार कमी लोकांमध्ये असते. अशावेळी लोक बँकेतील एफडी किंवा पोस्ट ऑफिस मधील खास योजनांकडे वळतात. कारण पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनेमध्ये आकर्षक व्याजदर आणि 100% सुरक्षतेची हमी दिली जाते.
भारतातील कोट्यावधी लोक पोस्ट ऑफिसच्या योजनेवर विश्वास ठेवून अनेक लाखाचे गुंतवणूक करतात. कारण इथे सरकारी हमी असते तसेच परतावाही चांगला मिळतो. आज आपण पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जी बँकेच्या एफडी योजनेप्रमाणेच काम करते. आणि गुंतवणूकदारांना आकर्षक असा परतावा मिळवून देते. Post Office FD Scheme
हे पण वाचा| गणेशोत्सवाआधी सोनं चांदी झाले स्वस्त, 10 ग्रॅम साठी किती पैसे मोजावे लागणार?
पत्नीच्या नावावरील गुंतवणूक फायद्याची
आपल्या घरी पत्नी हीच खरी लक्ष्मी असे मानले जाते. त्यामुळे अनेक जण आपल्या पत्नीच्या नावावर बचत करून ठेवतात. उदय एखाद्या मोठ्या खर्चासाठी जसे की, घर खरेदी करणे घर बांधकाम मुलांचे लग्न शिक्षण हॉस्पिटल अशावेळी मोठे रक्कम लागते तर पत्नीच्या नावावर जमा केलेली ही एफ डी त्यावेळी मोठ्या फायद्याची ठरते. याशिवाय पत्नीच्या नावाने बचत खाते खोलल्यास कर सवलत मिळते. त्यामुळे पत्नीच्या नावाने गुंतवणूक करणारे अनेक लोक आहेत. इतर बँक प्रमाणेच पोस्ट ऑफिस मध्ये एफडी करता येते पण इथं व्याजदर जास्त मिळतो आणि सुरक्षिता संपूर्ण मिळते.
पोस्ट ऑफिस एफडी योजना व्याजदर
- एक वर्षाच्या FD वर 6.9% व्याज मिळते
- दोन वर्षाच्या FD वर 7.0% व्याजदर मिळतो.
- तीन वर्षाच्या FD वर 7.1% व्याजदर मिळतो.
- पाच वर्षाच्या FD वर 7.5% व्याजदर मिळतो.
पत्नीच्या नावाने एक लाख रुपयाची गुंतवणूक केल्यास किती परतावा मिळेल?
जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर एक लाख रुपयाची एफडी 24 महिन्यासाठी केली तर सात टक्के वार्षिक व्याजदराने तुमच्या एफडीवर एकूण सात हजार 185 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच दोन वर्षाच्या शेवटी तुमच्या पत्नीच्या खात्यात एकूण एक लाख 7 हजार 185 रुपये जमा होतील. यामध्ये मूळ रक्कम एक लाख रुपये प्लस व्याज 7.85 रुपये असेल.
2 thoughts on “Post Office FD Scheme: बायकोच्या नावावर फक्त ₹1 लाख ठेवले तर 24 महिन्यांनी किती पैसे मिळतील?”