1 सप्टेंबरपासून दुचाकीस्वारांसाठी नवे नियम लागू! नियम मोडणाऱ्यांवर होणार मोठी कारवाई


Traffic Challan New Rules: प्रत्येक जण रस्त्यावर निघाल्यावर हीच काळजी असते की आपण सुखरूप घरी पोहोचावे. मात्र गेल्या काही वर्षात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामागे मुख्य कारण म्हणजे वाहतूक नियमांकडे होत असलेले दुर्लक्ष. यामध्ये हेल्मेट न घालणं, सिग्नल तोडणे, दारू पिऊन गाडी चालवणे अशा अनेक प्रकारच्या कारणांमुळे अपघात मोठ्या प्रमाणात होतात. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने वाहतूक नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नवीन नियमानुसार दुचाकी वाहन चालकांनी नियमाचे पालन न केल्यास त्यास तब्बल दहापट जास्त दंडाची रक्कम द्यावी लागणार आहे.

काय बदलले नियम?

  • दंडात दहापट वाढ: आधी शंभर रुपयांचा दंड आकारला जात असे मात्र आता एक सप्टेंबर पासून एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. सिग्नल तोडला तर थेट पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
  • ई–चलन व्यवस्था: ट्राफिक पोलीस आता हातात मशीन घेऊन चालन काढत नाहीत तर सीसीटीव्ही कॅमेरे वरून थेट उल्लंघन पकडले जाते आणि मोबाईलवर ई–चलन पोहोचते.
  • लायसन जप्त करण्याची तरतूद: दारू पिऊन वाहन चालवल्यास केवळ दंड आकारला जाणार नाही तर थेट सहा महिन्याचा तुरुंगवास आणि लायसन रद्द करण्यात येणार आहे.
  • अल्पवयीन वर कडक कारवाई: अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांनी वाहन चालवल्यास पालकांवर 25 हजार रुपयांचा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

हे पण वाचा| बायकोच्या नावावर फक्त ₹1 लाख ठेवले तर 24 महिन्यांनी किती पैसे मिळतील?

ई–चलन कसे भरायचे?

अनेक वेळा दंड भरण्यासाठी चालकांना पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज पडत होती मात्र आता यामध्ये बदल झाला आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील चलन भरू शकता. Traffic Challan New Rules

  • यासाठी सर्वप्रथम echallan.parivahan.gov.in या वेबसाईटवर भेट द्या.
  • Check challan status वर क्लिक करून वाहन क्रमांक किंवा चलन क्रमांक टाका.
  • ऑनलाइन पेमेंट क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग ने दंड भरा.
  • पेमेंट झाल्यावर पोचपावती घ्या आणि ती जपून ठेवा.

हा बदल महत्त्वाचा

सरकारने हा निर्णय फक्त पैसे वसूल करण्यासाठी घेतल्या नसून रस्त्यावरील नागरिकांना शिस्त लावण्यासाठी घेतलेला आहे. अपघातात कोणाचे संसार उध्वस्त होतात तर कोणाचे पालक परके होतात. प्रत्येक वेळेस अपघात झाल्यानंतर आपल्याला वाटते हेल्मेट असतं तर चांगलं झालं असतं. त्यामुळे वाहन चालकांनी सर्व नियमाचे पालन केले तर त्यांचा जीव धोक्यात जाणार नाही. म्हणूनच हा दंड मोठा असला तरी तुमच्या हिताचा आहे. त्यामुळे नागरिकांनी या नियमाचे गंभीर्याने पालन करावे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “1 सप्टेंबरपासून दुचाकीस्वारांसाठी नवे नियम लागू! नियम मोडणाऱ्यांवर होणार मोठी कारवाई”

Leave a Comment

error: Content is protected !!