62% घसरलं HDFC Bank? गुंतवणूकदारांचा धडकी भरवणारी बातमी पण सत्य वेगळंच…

HDFC Bank Bonus Share Latest News | आज सकाळपासून शेअर बाजारामध्ये एक चर्चेला उधाण आल आहे. ते म्हणजे HDFC बँकेचा शेअर बाजार तब्बल 62 टक्क्यांनी पडला. अनेक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले अरे एवढं मोठं बँक भारतातील नंबर वन प्रायव्हेट बँक, तिचा शेअर मार्केट इतक्या पैशाने पडलं कस काय? असा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे पण खरी गोष्ट मात्र वेगळीच आहे, जी समजून घेतली नाही तर गैरसमज निर्माण होणार आहे. HDFC Bank Bonus Share Latest News

आज 26 ऑगस्ट हा दिवस खास आहे, कारण एचडीएफसी बँक पहिल्यांदा आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देत आहे. नियमा असा की, ज्या गुंतवणूक दाराकडे एक जुना शेर आहे त्याला अजून एक मोफत शेअर मिळणार. म्हणजे शेअरची संख्या दुप्पट झाली, आणि त्याचमुळे बाजारात दर कमी दिसतोय.

आज सकाळी HDFC चा शेअर जवळपास 982 रुपयांनी उघडला, काही वेळा 968 रुपयांवर घसरला, पण पुन्हा सावरला. बोनस नंतर त्याचा 72 आठवड्यांचा हाय 1018 रुपये, तर लो 806 रुपये असा दिसतोय. मार्केट कॅप मात्र बदललेलं नाही अजूनही तब्बल 14.97 लाख कोटी रुपयांचा हाय बँकिंग दिग्गज आहे.

कंपनी बोनस का देतात?

तर कंपनी बोनस का देतात? छोट्या गुंतवणूकदारांना संधी मिळावी, बाजारात शेअरची संख्या वाढवावी आणि कंपनीला आपल्या व्यवसायावर विश्वास आहे हे दाखवायचं असतं. आज बोनसची रेकॉर्ड डेट होती, म्हणजे ज्यांच्या नावावर सोमवारी शेअर्स होते त्यांना हा लाभ मिळणार. आज खरेदी करणाऱ्यांना मात्र हा फायदा मिळणार नाही.

थोडक्यात HDFC बँक अजूनही तगडी आहे, घसरण झाली असं दिसतंय ते फक्त कागदोपत्री आहे. खरी किंमत, कंपनीचा विश्वास आणि गुंतवणूकदारांचा फायदा हे सगळं व्यवस्थित आहे.

(Disclaimer  : वरी दिलेली माहिती ही प्रसार माध्यमांच्या आधारे आहे इथे कोणताही गुंतवणुकीचा सल्ला दिलेला नाही. शेअर बाजार जखमीचा आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे खूप आवश्यक.)

हे पण वाचा | Vikram Solar IPO: शेअर बाजारात आज भव्य पदार्पण, ग्रे मार्केटने दाखवला जबरदस्त प्रीमियम

Leave a Comment

error: Content is protected !!