महत्त्वाची बातमी! लाडक्या बहिणींनो ‘हे’ काम करा, अन्यथा मिळणार नाहीत ₹1500


Mazi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाखो महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहिणी योजना ही खऱ्या अर्थाने त्यांना आधार देणारी ठरली आहे. दर महिन्याला या योजनेअंतर्गत मिळणारे 1500 रुपये त्या कुटुंबांना दिलासा देत आहेत. यामध्ये घरचा किराणा मुलांचे शिक्षण औषधे किंवा छोट्या-मोठ्या खर्चासाठी मोठी मदत मिळत आहे. मात्र आता सरकारकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे. जी प्रत्येक लाभार्थी महिलांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा.

ई केवायसी अनिवार्य

लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना जुलै महिन्यापर्यंत लाभ मिळाला आहे. यानंतर ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. मात्र त्या अगोदर राज्य सरकारने हे स्पष्ट केले आहे की, लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येक लाभार्थ्यांना ई केवायसी करणे आवश्यक आहे. अनेक महिलांनी अर्ज करताना चुकीची माहिती दिली असल्यामुळे अशा अर्जांची आता पुन्हा छाननी करून अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. आतापर्यंत तब्बल 26 लाख महिलांच्या अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे अजूनही अनेक महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.

या महिलांना मिळणार नाहीत पैसे

  • महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी नसल्यास लाभ मिळणार नाही.
  • ज्या महिलांनी योजनेच्या निकषाचे उल्लंघन केले आहे.
  • चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली आहे.
  • आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांनी अजून ई केवायसी केली नाही.

हे पण वाचा| लाडक्या बहिणींना ऑगस्ट अन् सप्टेंबरचा हप्ता एकत्रित मिळणार? या दिवशी खात्यात ₹3,000 जमा होण्याची शक्यता

अशा महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही. म्हणजेच अशा महिलांना पंधराशे रुपयांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येक लाभार्थी महिलांनी वेळेआधी ई केवायसी करणे बंधनकारक आहे.

ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

राज्यातील लाखो महिला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पण अजून सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आता महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर मध्ये मिळणार की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचबरोबर ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार मिळणार का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र अंतिम निर्णय सरकारच्या घोषणेनंतर स्पष्ट होईल. त्यामुळे सरकारच्या अधिकृत घोषणेची वाट पाहणे महत्त्वाची ठरणार आहे.

लाडक्या बहिणींनो हे काम लक्षात ठेवा

लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधीही मिळू शकतो. मात्र त्या अगोदर लाडक्या बहिणींनी काही महत्त्वाची कामे लक्षात घेणे गरजेचे आहे. ही योजना फक्त आर्थिक मदत देणारी योजना नसून महिलांच्या शशक्तीकरणासाठी महत्त्वाची पायरी ठरणार आहे. म्हणून सरकारकडून नियम पाळणे आणि वेळेत ई केवायसी करणे प्रत्येक लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. 1500 रुपयाची रक्कम थांबू नये यासाठी लगेच ई केवायसी करून घ्या. Mazi Ladki Bahin Yojana

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!