Astrology: ज्योतिषशास्त्रात म्हटलंय ग्रह-ताऱ्यांची हालचाल माणसाचं जीवन बदलते. मेहनत करूनही काहीवेळा हवं तसं फळ मिळत नाही, पण जेव्हा ग्रहमान जुळून येतं तेव्हा यश आपोआप मिळतं.Astrology
25 ऑगस्ट 2025 रोजी चंद्र आणि मंगळाची युती कन्या राशीत झाली आहे. ही युती 27 ऑगस्टपर्यंत राहणार असून यामुळे 3 भाग्यशाली राशींवर प्रचंड चांगले परिणाम होतील. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी
सिंह (Lion) : सिंह राशीच्या लोकांना या युतीमुळे धनलाभ आणि व्यवसायात मोठा फायदा होईल. नवीन भागीदारांकडून साथ मिळेल, तर दुकानदारांचे काम वाढेल. अविवाहितांना जुन्या मित्राकडून नात्याचा प्रस्ताव येऊ शकतो. प्रेम जीवनातील अडचणी संपतील. दूरच्या नातेवाईकाकडून आनंदाची बातमी मिळेल.
कन्या (Virgo) : कन्या राशीसाठी ही युती म्हणजे गोल्डन टाईम! नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. व्यापाऱ्यांचा व्यवसाय विस्तारेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. वृद्धांचे आरोग्य सुधारेल आणि नातवंडांबरोबर वेळ घालवल्याने मन प्रसन्न होईल.
मकर(Capricorn) : मकर राशीवाल्यांसाठीही ही युती शुभ ठरणार आहे. विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळेल आणि चांगल्या सवयी अंगी येतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, व्यवसाय स्थिर होईल. कुटुंबातील मदतीने तरुण स्वतःचं काम सुरू करू शकतात. विवाहितांसाठी एकट्याने लांब प्रवासाची शक्यता आहे.
(Disclaimer : वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही आणि अंधश्रद्धेला दुजारा देत नाही)