Post Office Scheme: आज-काल महागाईच्या काळात प्रत्येकालाच आपला उद्याचा आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी गुंतवणूक करावी अशी अपेक्षा असते. पण शेअर बाजार किंवा इतर धोकादायक गुंतवणुकीपेक्षा सुरक्षित आणि हमखास परताव देणारे योजना अनेक जण शोधत असतात. अशा लोकांसाठी पोस्ट ऑफिसच्या योजना अधिक फायद्याच्या ठरतात. यातच बँक आणि पोस्ट ऑफिसच्या योजना अनेक कुटुंबाच्या जीवनाचा आधार बनले आहेत. सध्या पोस्ट ऑफिस ची public provident fund योजना सुप्रसिद्ध ठरत आहे. ही योजना सुरक्षित असून त्यात कर वसुली पासून आकर्षक व्याजदरापर्यंत अनेक फायदे मिळतात.
PPF योजनेचे वैशिष्ट्ये
- या योजनेचा कालावधी 15 वर्ष चा आहे.
- तुम्ही फक्त पाचशे रुपये पासून या योजनेत गुंतवणूक करू शकता.
- वर्षाकाठी जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवणूक करता येते.
- गुंतवणुकीवर मिळणारे 7.1% व्याजदर आकर्षक कायदा मिळवून देतो.
- योजनेत गुंतवलेले पैसे त्यावरील व्याज आणि मॅच्युरिटी वेळी मिळणारी अंतिम रक्कम सर्व टॅक्स फ्री असणार आहे.
- पंधरा वर्षानंतर ही योजना आणखीन पाच पाच वर्षे वाढवण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. तुम्हाला हवा असल्यास पंचवीस वर्षांपर्यंत गुंतवणूक चालू ठेवता येते.
हे पण वाचा| १ सप्टेंबर पासून या ७ नियमात होणार मोठा बदल! तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
18 लाख 18 हजार व्याज कसे मिळवावे?
समजा तुम्ही दरमहा 12 हजार पाचशे रुपये बचत करून पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केली. म्हणजे एका वर्षासाठी एकूण 1.5 लाख रुपये गुंतवणूक झाली. पंधरा वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 22.5 लाख रुपये झाली. यावर हमखास व्याज 18.18 लाख रुपये मिळते. मॅच्युरिटी नंतर तुमच्या हातात एकूण 40.68 लाख रुपये मिळतील. म्हणजेच त्यातून फक्त पंधरा वर्षे गुंतवणूक करून तुम्हाला तब्बल 18 लाख पेक्षा जास्त व्याज मिळू शकते. Post Office Scheme
आज कालच्या धावपळीच्या आणि महागाईच्या जीवनात चांगली बचत करणे खूप अवघड झाले आहे. पण जर महिन्याला थोडीशी शिस्त पाळून नियमितपणे पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे टाकले तर पंधरा वर्षानंतर तुमच्याकडे एक मोठा निधी तयार होऊ शकतो. 40 लाखाचा निधी हातात आल्यानंतर निवृत्ती नंतरचे जीवन मुलांचे शिक्षण मुलीचे लग्न घराचे स्वप्न सर्वकाही एकाच वेळी साकारता येऊ शकते. म्हणूनच जोखीम टाळायची आणि खात्रीशीर परतावा मिळवायचा असेल तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करा.