LPG Gas Cylinder Price: सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सणासुदीच्या काळामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती घसरले आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये महालक्ष्मीचा सण सुरू आहे या सणानिमित्त एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तील विपणन कंपन्या नवीन दर जाहीर करतात. एक सप्टेंबर 2025 रोजी देखील एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर झाले आहेत. यामध्ये १९ किलोच्या व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त मिळणार आहे.
व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत घसरण
तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमती निश्चित करून नवीन दर जाहीर करतात. या महिन्याच्या सुधारित दरामध्ये बदल होऊन देशभरातील व्यावसायिक ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. नवीन किंमत एक सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 51.50 रुपयाची कपात झाली आहे. 19 किलोचा व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1580 रुपये झाली आहे. 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. LPG Gas Cylinder Price
हे पण वाचा| पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून 18 लाख 18 हजार व्याज मिळवा..वाचा संपूर्ण प्लॅन
व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती मागील काही महिन्यापासून सातत्याने बदलत आहेत. यामध्ये मागील काही महिन्यापासून घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. एक ऑगस्ट 2025 रोजी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती 33.50 रुपयाची घसरण झाली होती. त्याआधी एक जुलै रोजी 58.50 रुपयांनी व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाला होता. जून मध्ये देखील 24 रुपयांनी एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत घसरली होती. त्याआधी एप्रिलमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1762 होती यामध्ये आतापर्यंत व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ये 182 रुपयाची घसरन झाली आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही
मागील काही महिन्यापासून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडर हे दोन एकाच प्रकारचे इंधन असले तरी त्याचा वापर आणि किमती वेगवेगळ्या आहेत. इतर काही बाबींमध्ये मोठा फरक असतो त्याच्यातील प्रमुख फरक म्हणजे घरगुती सिलेंडर हा प्रामुख्याने घरगुती स्वयंपाकासाठी वापरला जातो. घरगुती गॅस सिलेंडर आकाराने लहान असतो 14.2 किलो गॅस यामध्ये मिळतो. त्याचबरोबर घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरवर अनुदान देखील मिळते. त्यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरपेक्षा याची किंमत कमी असते. हे गॅस सिलेंडर एजन्सी आणि डीलर्स कडून सहज उपलब्ध होतात आणि ग्राहक ऑनलाईन किंवा मोबाईलवर आपले बुकिंग करू शकतात.
व्यावसायिक कामासाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरण्यास सरकारकडून सक्त मनाई आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर हा फक्त व्यवसायासाठी वापरला जातो. या सिलेंडरचा आकार 19 किलो असतो. व्यावसायिक गॅस सिलेंडर वापर हॉटेल मेस विविध केटरिंग आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये प्रामुख्याने केला जातो. व्यावसायिक गॅस सिलेंडरची किमती दर महिन्याला बदलतात. या सिलेंडर साठी सरकारकडून कोणतेही अनुदान मिळत नाही त्यामुळे याची किंमत घरगुती गॅस सिलिंडर पेक्षा जास्त असते.
