Weather update | राज्यामध्ये जोरदार धो-धो पाऊस बरसणार आयएमडी चा मोठा इशारा

Weather update | ऑगस्ट चा शेवट जसा झाला, तसंच सप्टेंबरच्या सुरुवातीला देशभरामध्ये पावसाचं वातावरण तयार झाल आहे असं हवामान खात्याने स्पष्ट केल आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) पुन्हा एकदा नवीन अंदाज जाहीर केला असून यंदा सप्टेंबर महिन्यात पावसाची कमतरता न राहता उलट सरासरीपेक्षा जास्त तब्बल 109% पाऊस देशात कोसळणार असे सांगण्यात आलेला आहे. Weather update

गेल्या तीन महिन्याचा विचार केला असून एक जून ते 31 ऑगस्ट सरासरी पेक्षा जास्त 6% पाऊस नोंदवला गेला. त्यामुळे या मान्सूनचे समीकरण आधीच सकारात्मक आहे. आता सप्टेंबर मध्ये हा पाऊस आणखी जोमात पडणार असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही निश्चित मोठी दिलासादायक बातमी आहे. मात्र, कोकणात हवामान खात्याने सरासरीपेक्षा कमी पावसाचा इशारा दिलेला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार, सप्टेंबर महिन्यात सरासरी 168.9 मिलिमीटर पाऊस नोंदवला जातो. यंदा तो सरासरीपेक्षा जास्त म्हणजे जवळपास 109 टक्क्यांच्या आसपास असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. उत्तर भारताचा टोकाचा भाग, ईशान्य भारत, तसेच दक्षिण भारताच्या काही पट्ट्यांमध्ये पाऊस किंचित कमी पडेल. पण उर्वरित बहुतांश राज्यांमध्ये सप्टेंबर मध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस होणार.

महाराष्ट्रात देखील पावसाचा फायदा दिसून येणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागात जास्त पाऊस होऊ शकतो, असं हवामान खातं सांगतंय. मात्र दक्षिण कोकण आणि उत्तर कोकणाच्या काही भागात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीला फायदा जरी झाला तरी काही ठिकाणी पाणी टंचाई सारखी परिस्थिती भासू शकते. उलट मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका सध्या हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे.

या पावसाचा थेट परिणाम तापमानावरती दिसणार आहे. देशभरात सरासरी तापमान सप्टेंबर मध्ये कमी होण्याची शक्यता आहे. पण भागात पाऊस कमी असेल, तिथं तापमान उलट वाढलेलं असेल असं दिसू शकतं. ईशान्य भारत आणि कोकणात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. किमान तापमान मात्र बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त असणार.

शेतकऱ्यांसाठी या अंदाजा थेट परिणाम होणार आहे. भरपूर पाऊस झाल्यास खरीप हंगामाला दिलासा मिळेल, पिक उभा राहतील. पण त्याच वेळी जास्त पाऊस झाल्यास पूर परिस्थिती, नदी नाल्यांना आलेलं पाणी आणि पिकांचे नुकसान याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हवामान भागाचा इशारा लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आणि प्रशासनाने सज्ज राहणं गरजेचे आहे.

हे पण वाचा | राज्यात मूळ मान्सूनचा पाऊस या तारखेपासून सुरू होणार! जाणून घ्या हवामान विभागाचा नवीन अंदाज…

Leave a Comment

error: Content is protected !!