व्हाट्सअप चे १० भन्नाट ट्रिक्स! कोणालाच माहित नाही, अनेक कामे होतील सोपी

Whatsapp Tricks: आता व्हाट्सअप हे फक्त मेसेजिंग ॲप राहिले नाही. आज जगभरात दोन अब्ज पेक्षा जास्त लोक रोजच्या वापरासाठी त्याचा आधार घेत आहेत. कुणाशी गप्पा मारायच्या असोत फाईल शेअर करायच्या असो किंवा व्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल करायचा असो, व्हाट्सअप शिवाय आपलं दैनंदिन जीवन अपूर्ण वाटतं. मेटा कंपनी सतत या ॲपमध्ये नवनवीन बदल करत आहे. व्हाट्सअप मध्ये अनेक असे फीचर्स जोडले आहेत जे आपल्याला माहीतच नसतात. या नवीन फीचर्सचा वापर करून तुम्ही अनेक काम अगदी जलद गतीने सहजपणे करू शकता. आज आपण अशा दहा नवीन पिक्चर्स बद्दल जाणून घेणार आहोत. ज्या तुमच्या व्हाट्सअप वापरण्याचा अनुभव अधिक स्मार्ट सोपा आणि मजेदार करतील.

  • गुप्त चाट लॉक करण्याची सुविधा

आता तुमच्याकडे वैयक्तिक किंवा खाजगी संभाषण असेल तर ते इतरांच्या नजरेपासून वाचवता येते. फिंगरप्रिंट फेस आयडी किंवा स्वतंत्र पासपोर्ट लावून ते चार्ट तुम्ही सुरक्षित लॉक करू शकता. Whatsapp Tricks

  • एका फोनवर दोन व्हाट्सअप अकाउंट

पूर्वी एकाच मोबाईलवर दोन अकाउंट वापरता येत नव्हते. पण आता एकच मोबाईलवर एकच ॲपच्या मदतीने वैयक्तिक जीवन आणि इतर कामाचे जीवन वेगळे ठेवण्यासाठी ही सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

  • Meta AI ची जादू

व्हाट्सअप मध्ये आता मेटा यायचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी सहजपणे करू शकता. याच्या मदतीने हवामान क्रीडा स्कोर बँकिंग न्यूज किंवा इतर कोणतीही माहिती सहजपणे मिळू शकतात.

  • Delete For Me झालं तरी टेन्शन नको

कधी कधी आपण चुकून डिलीट फॉर मी करतो आणि मग मेसेज परत मिळत नाही आता व्हाट्सअप च्या नवीन पिक्चर नुसार तुम्ही तो मेसेज Undo करू शकता.

हे पण वाचा| दहावी-बारावी पास तरुणांना मिरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी, 358 जागांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू..

  • स्वतःचे खास स्टिकर्स तयार करा

आता तुमच्या फोटोवरून थेट स्टिकर तयार करू शकता. इतकंच नव्हे तर या याच्या मदतीने वेगवेगळी आकर्षक स्टिकर्स तयार करून गप्पा मध्ये रंगत आणता येते.

  • नंबर सेव न करता मेसेज पाठवा

पूर्वी एखाद्याला मेसेज करायचा असेल तर नंबर सेव्ह करावा लागायचा आणि त्यानंतर तो whatsapp मधून मेसेज करावा लागायचा. पण आता फक्त नंबर आणि कंट्री कोड टाकला की थेट चॅट सुरू करता येते.

  • एडिट फीचर ची धमाल

मेसेज पाठवल्यानंतर एखादी चूक झाली आणि ती तुमच्या लक्षात आल्यानंतर तो मेसेज डिलीट करायची गरज नाही कारण आता तुम्ही मेसेज एडिट करून पुन्हा योग्य स्वरूपात पाठवू शकता.

  • चॅट बॅकअपची हमी

मोबाईल बदलला किंवा ॲप पुन्हा इन्स्टॉल केलं तर काळजी करू नका चॅट बॅकअप ऑन केल्यास तुमची जुनी संभाषण सुरक्षितपणे पुन्हा मिळतील.

  • कस्टम नोटिफिकेशन टोन

काही खास व्यक्तींचे मेसेज वेगळे ओळखण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी खास नोटिफिकेशन टोन सेट करू शकता.

  • डिसॲपीअरिंग मेसेजेस

गुप्त किंवा तात्पुरती माहिती शेअर करतात अशावेळी डिसॲपीअरिंग मेसेजचा वापर करा. यामुळे ठराविक वेळेनंतर ते मेसेज आपोआप गायब होतील.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “व्हाट्सअप चे १० भन्नाट ट्रिक्स! कोणालाच माहित नाही, अनेक कामे होतील सोपी”

Leave a Comment

error: Content is protected !!