Kunbi Certificate: कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं? शासन आदेश जारी, जाणून घ्या सविस्तर माहिती

Kunbi Certificate: मराठा समाजाने आरक्षणासाठी दीर्घकाळ संघर्ष केला आहे. मराठ्यांचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या आंदोलनाने मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मदत होत आहे. मराठ्यांच्या या आंदोलनाला यश आला असून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत महत्त्वाचा शासन आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील पात्र नागरिकांना आता कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यांना आरक्षणाचा फायदा मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी काय प्रोसेस आहे?

ऐतिहासिक कागदपत्राचा आधार महत्त्वाचा

राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटीआर मधील 1921 व 1931 या सालच्या नोंदीचा आधार घेण्याचे ठरवले आहे. या नोंदीमध्ये कुणबी समाजाचा उल्लेख कापू या शब्दाने केला गेला आहे. मराठ्यांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे त्यांना कुणबी म्हणून मान्यता मिळते. त्यामुळे मराठा समाजासाठी हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. या गॅझेटीआर मध्ये नोंदी असलेल्या सर्व मराठा वंशज्यांना कुणबी प्रमाणपत्र जारी केले जाणार आहे. Kunbi Certificate

हे पण वाचा| लाडक्या बहिणींना ऑगस्ट-सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार? ₹3,000 खात्यात जमा होण्याची शक्यता

गावोगावी समिती स्थापन होणार

कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया पारदर्शक व्हावी म्हणून प्रत्येक गाव पातळीवर तीन सदस्यांची समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीचे अधिकारी खालील प्रमाणे असतील—

  • ग्राम महसूल अधिकारी
  • ग्रामपंचायत अधिकारी
  • सहाय्यक कृषी अधिकारी

या समितीचे काम अर्जदाराचे सर्व कागदपत्रे अचूक तपासून हा अर्जदार कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी पात्र आहे का नाही याबाबतीत निर्णय घेणार आहे.

कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करावा?

जर तुम्हाला कोंबडी प्रमाणपत्र काढायचे असेल तर अशा प्रकारे अर्ज करून तुम्ही काढू शकता.

  • ज्यांच्याकडे शेतजमीन आहे त्यांनी शेतजमिनीचा मालकी पुरावा द्यायचा आहे.
  • ज्याच्याकडे जमीन नाही त्यांच्याकडे जमिनीचा पुरावा नाही त्यांनी 13 ऑगस्ट 1975 पूर्वी किंवा त्याआधी त्या गावात राहत असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर अधिकारी तपास करतील की, अर्जदाराचा गावात किंवा कुळात नातेसंबंध आहे का? जर त्या नात्यातील कोणाकडे कुणबी प्रमाणपत्र असतील तर त्याचा आधार घेऊन नवीन अर्जदाराला प्रमाणपत्र मिळू शकते.

मराठा बांधवांना मोठा दिलासा

आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करत असणाऱ्या मराठा समाजाच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक आंदोलन उपोषण आरक्षणासाठी करण्यात आली. मात्र आता शासनाने कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यामुळे मराठा समाजात आनंद पसरला आहे. गावोगावी आता लोक आपली कागदपत्रे गोळा करून अर्ज करण्याची तयारी करत आहेत. शासनाचा हा निर्णय मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरत आहे. आपल्या मुलांच्या शिक्षणाला नोकरीला याचा थेट फायदा मिळणार आहे. अतोनात संघर्षातून मिळालेला हा विजय समाजातील लेकरांना घडवण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!