Pm Kisan Yojana 21th Hapta | देशभरातील शेतकरी आजही आपल्या कष्टाने जमीन पिकवतो पण त्याच्या हातात पैशाचं सुख क्वचित लागून राहतं. शेतीला खर्च जास्त, बाजारात भाव कमी, त्यातच वातावरणाचा बदल, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशी परिस्थिती शेतकऱ्यांना कर्जबाजारीच्या दिशेने ढकलते. शेतकऱ्याचा हा भार थोडा हलका करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत दरवर्षी सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम दिली जाते प्रत्येक हप्त्याचे वेळी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतात. Pm Kisan Yojana 21th Hapta
आतापर्यंत 20 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचलेत. आता सगळ्या शेतकऱ्यांच्या नजरा 21 व्या हप्त्यावर आली आहे. दिवाळी जवळ आली आणि शेतकऱ्यांच्या बांधवांच्या मनात एक प्रश्न या दिवाळीला सरकार आपल्या खात्यामध्ये पैसे जमा करणार का? याबाबत आपल्याला एक अपडेट मिळाली आहे जाणून घेऊया सविस्तर माहिती.
शेतकऱ्यांना कधी मिळणार हा हप्ता?
मिळाल्या माहितीनुसार, केंद्र सरकार नोव्हेंबर डिसेंबर मध्ये 21 व्या हप्ता जाहीर करू शकत. म्हणजे दिवाळीपूर्वी हप्ता मिळेल अशी शक्यता कमीच दिसते. पण तरी सरकारकडून अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.
या योजनेचा फायदा घेत असेल तर सर्व वाटी पाळणे गरजेचे आहे. ज्यांनी e-KYC केली नाही, जमीन अभिलेख पडताळणी (भूलेख व्हेरिफिकेशन) केलं नाही, किंवा बँक खाते आधारशी जोडलेलं नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत. अनेक शेतकरी अजूनही या टप्प्यात अडकून बसले आहेत आणि त्यामुळे पैसे थांबतात. म्हणूनच, भाऊ, उगाच वेळ घालवू नका e-KYC, आधार लिंकिंग आणि जमीन पडताळणी लवकर करा.
सरकार पैसे सोडताच ते तुमच्या खात्यात जमा झालेत का ते चेक करा. आजकाल मोबाईलवरून बँकिंग सोपं झालंय, त्यामुळे बँकेत फेऱ्या मारायची गरज नाही.
शेतकऱ्यांच्या घामाचा प्रत्येक थेंब सोन्याहून मौल्यवान आहे. त्याच्या कष्टाची खरी किंमत बाजारात मिळत नाही, तेव्हा सरकारकडून मिळणारे असे हप्ते थोडाफार दिलासा देतात. दिवाळीच्या काळात शेतकऱ्याच्या घरातली चूल पेटलेली राहावी, लेकरांच्या हातात नवे कपडे यावेत, याचसाठी ही योजना आहे.
पण लक्षात ठेवा, या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रं वेळेत पूर्ण करणे हे तुमच्या हातात आहे. सरकार तारीख कधीही जाहीर करेल, पण तयारी जर अपुरी राहिली तर पैसे अडकू शकतात.
शेतकरी बांधवांना सर्वप्रथम सरकारी वेबसाईट आणि स्थानिक कृषी कार्यालयांमधून योग्य ती माहिती तपासून घेऊन खात्री करा त्यानंतर काही प्रलंबित नाही ना याची खात्री करा. दिवाळीपूर्वी हे पैसे मिळतील किंवा नंतर मिळतील परंतु त्या पावसाच्या आधी आपली कुठलीही चुकी होता कामा नये हे मात्र नक्की. आणि अशाच अपडेट साठी आम्हाला फॉलो करत चला.
हे पण वाचा | पीएम किसान योजनेचे ₹2000 खात्यावर आलेत की नाही? ‘अशी’ चेक करा PM किसानची लाभार्थी यादी..
