Namo shetkari Yojana 7th installment : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी (Good news for farmers) समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील नमो शेतकरी (Namo Shetkari Yojana) योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आली आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते आणि हा आता कधी येणार? याबाबत प्रश्न विचारत असताना ही योजना बंद तर झाली नाही ना अशी चर्चा चालू झाली होती. परंतु आता सरकारने याबाबत निर्णय घेतलेला असून या योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी 1932.72 कोटी रुपयांच्या निधी वितरण करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. शासनाचे या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. Namo shetkari Yojana 7th installment
राज्यातील तब्बल 94 लाख शेतकरी या हप्त्याची वाट पाहत होते. या योजनेमध्ये काही अफवा देखील पसरवल्या जात होत्या की ही योजना बंद होणार आहे आता शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही पण सरकारच्या या निर्णयामुळे आता सगळ्या चर्चांना कुलूप लागलेल आहे. .
योजनेबद्दल थोडक्यात: केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षासाठी सहा हजार रुपये मिळतात, आणि राज्य सरकार या योजनेच्या आधारे आणखी हातभार लावण्यासाठी स्वतंत्रपणे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना राबवते. या योजनेतून शेतकऱ्याला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळते. म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरातून एकूण 12,000 जमा होतात. आता मंजूर झालेला सातवा हप्ता हा एप्रिल 2025 चे जुलै 2025 या कालावधीमध्ये साठी आहे. परंतु सध्या वितरणास विलंब झाल्यामुळे लवकरच वितरण होणार आहे.
कधी होणार हप्ता जमा?
कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या विसव्या हप्त्याची आकडेवारी आधारित मागणी राज्य सरकारकडे पाठवली होती. त्यानुसार हा निधी मंजूर झाला आहे. विशेष बाब म्हणजे ज्यांची PFMS नोंदणी प्रलंबित आहे किंवा ज्यांचे आधार लिंक बँकेतून गायब झाले आहे. त्यांनाही निधीचा लाभ दिला जाणार आहे. या निधीचे योग्य ते लाभ खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोचला पाहिजे त्यात कुठलाही गैर व्यवहार होऊ नये याची जबाबदारी थेट कृषी आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे. हा निर्णय वित्त व नियोजन विभागाच्या सहमतीत जारी करण्यात आला आहे.
हे पण वाचा | Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार? आली मोठी अपडेट समोर
