PM Kisan Yojana: देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. सध्या देशातील शेतकरी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन ऑगस्ट 2025 रोजी 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यानंतर आता पुढील हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र त्याआधीच केंद्रीय कृषिमंत्री यांनी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्लीमधून एक महत्त्वपूर्ण बैठकीत शेतकऱ्यांच्या तक्रारी निवारणासाठी नवीन पाऊल उचलला आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या योजना बाबत, पी एम किसान योजनेच्या त्याबाबत, कृषी विषयक समस्या बाबत शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी भटकंती करावी लागत होती. पण आता केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सगळ्या तक्रारीसाठी एकच स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले आहे.
या पोर्टलमुळे शेतकऱ्यांना पीएम किसान योजना, खत, बियाणे, विमा, पिक विमा, अनुदान, मार्केटिंग यासारख्या कोणत्याही तक्रारी थेट ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. एवढेच नाही तर या तक्रारीचं निवारण किती वेळात झालं कोणत्या टप्प्यात आहे याची सर्व माहिती शेतकऱ्यांना पाहता येणार आहे. यामुळे तक्रार केली तरी काम केले जात नाही हा शेतकऱ्यांचा कायमचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.
हे पण वाचा| अखेर तारीख जाहीर! नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये या दिवशी खात्यात जमा होणार?
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या तक्रारीवर स्वतः लक्ष ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या समस्यांची थेट दिल्लीपर्यंत दखल घेतली जाईल. प्रत्येक तक्रारीचे निवारण वेळेत करावे लागणार अशी सप्त ताकीदही अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. PM Kisan Yojana
पी एम किसान योजनेचा 21वा हप्ता कधी मिळणार?
गेल्या महिन्यात दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना विसावा हप्ता मिळाला होता. केंद्र सरकार दर चार महिन्यांनी प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते. एका वर्षात एकूण तीन आप्पे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. 21वा हप्ता कधी मिळणार याबाबत सरकारने अजून अधिकृतपणे घोषणा केली नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो.
आजच्या महागाईच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणं खूप महत्त्वाचे ठरत आहे. पिकाची पेरणी खत औषधे यासारख्या मोठ्या खर्चाच्या बाबी लक्षात घेता सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता. अशावेळी पीएम किसान योजनेचा हप्ता म्हणजे शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरत आहे. आता त्याच्या सोबतच त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी पोर्टल सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.