नमो शेतकरी योजनेंतर्गत 7व्या हप्त्याचा लाभ या दिवशी खात्यात जमा होणार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

Namo Shetkari Yojana: राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत सातवा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत. ही माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी दिली आहे. या हप्त्याचा लाभ राज्यातील तब्बल 92 लाख 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारा असून त्यासाठी तब्बल 1932.72 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वर्षाला मिळतात 12000 रुपये

शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ देशातील शेतकऱ्यांना देण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार अंतर्गत नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देखील राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयाची रक्कम दिली जाते. या दोन्ही योजनेअंतर्गत एकूण 12,000 रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो. Namo Shetkari Yojana

हे पण वाचा| अखेर तारीख जाहीर! नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये या दिवशी खात्यात जमा होणार?

सातवा हप्ता कधी मिळणार?

नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत 6 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. यानंतर मागील अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची प्रतीक्षा लागले आहे. राज्याची आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळे सातवा हप्ता वितरणासाठी उशीर झाला असल्याचे सांगितले जात आहे. वेळेप्रमाणे एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीमध्ये 7 हप्ता वितरित व्हायला पाहिजे होता. मात्र उशीर झाल्यामुळे हा हप्ता आता सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पी एम किसान योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कठीबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात आहे. अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मोठा आधार देणारा ठरणार आहे. तसेच बाधित पिकाचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यांनाही मदत मिळणार आहे.

या योजनेच्या हप्त्यामुळे खरीप हंगामात खर्चाचा भर घालणाऱ्या शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे. शेतीसाठी आवश्यक खत बियाणे औषधे याचा खर्च वाढत चालल्यामुळे शासनाने दिलेली ही मदत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. राज्य सरकारकडून दिला जाणारा हा सातवा हप्ता म्हणजे शेतकऱ्यांच्या श्रमाला प्रोत्साहन दिल्यासारखे आहे. पावसाने कर्जाने आणि बाजारभावाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही मदतीची रक्कम थोडी का होईना दिलासा देणारे ठरत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “नमो शेतकरी योजनेंतर्गत 7व्या हप्त्याचा लाभ या दिवशी खात्यात जमा होणार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!